एमपीएससी उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास सरकारची मान्यता 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मुंबई - राज्य सेवा परीक्षा-२०१७ आणि २०१८ मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास सरकारने आज मान्यता दिली. या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

राज्य सेवा परीक्षा-२०१७ आणि राज्य सेवा परीक्षा २०१८ मध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आज शासनाने माहिती दिली की, राज्य सेवा परीक्षा-२०१७ च्या निकालाच्या अनुषंगाने  शिल्पा साहेबराव कदम यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका केली होती. ही याचिका तसेच समांतर आरक्षणासंदर्भातील इतर याचिका यावरील विशेष सुनावणीअंती मुंबई उच्च न्यायालयाने ८ ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम आदेश  दिले. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा परीक्षा, २०१७ साठी शिफारस करण्यात आलेल्या ३७७ उमेदवारांची सुधारित यादी ९ सप्टेंबर २०१९ रोजी शासनास प्राप्त झाली. हे ३७७ उमेदवार आणि राज्य सेवा परीक्षा, २०१८ अन्वये  शिफारसप्राप्त १२९ असे एकूण ५०६ उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्र्यांची मान्यता प्राप्त झाली आहे.

Web Title: MPSC Pass Candidate Appointment Permission by Government

संबंधित बातम्या

Saam TV Live