डॉलरच्या तुलनेत रुपयाची पडझड सुरुच

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण आणखी वाढली आहे. सलग सातव्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक 72.10  अशा आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोचला आहे.

रुपया घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाला. करन्सी बास्केटमध्ये डॉलर जवळपास सर्वच आशियाई चलनांच्या  तुलनेत वधारतो आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती देखील वाढत चालल्या आहेत. प्रति पिंप 78 डॉलरला पोचला आहे. परिणामी देशांतर्गत  बाजारात देखील इंधनाचे दर वाढले आहेत. अमेरिका आणि चीनदरम्यान वाढत असलेला व्यापार क्षेत्रातील तणाव याशिवाय, अर्जेंटिना आणि तुर्कस्तानवरील वाढती संकटे आणि कच्च्या तेलाच्या जागतिक किंमतीतील वृद्धी यामुळे परदेशी मुद्रा विनिमय बाजारात निर्माण झालेली स्थिती रुपयाच्या घसरणीमागे असल्याचे बोलले जात आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live