मायावतींचे वादग्रस्त वक्तव्य - पत्नीला सोडणा-याकडुन काय अपेक्षा करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 मे 2019

नवी दिल्ली : 'राजकीय फायद्यासाठी आपल्या पत्नीला सोडणाऱ्याकडून दुसऱ्यांच्या पत्नी व बहिणीबद्दल आदर करण्याची अपेक्षा कशी करणार?', असे वादग्रस्त वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केले आहे.

'मोदी आपल्या पत्नीसोबत राहात नाहीत. त्यामुळे पक्षातील इतर पुरूषांच्या पत्नींना ते ही आपल्याला सोडून जातील अशी भिती वाटत आहे. मला अशी माहिती मिळाली आहे, असे मायावती यांनी सांगितले. भाजपचे लोक महिलांचा अनादर करतात, तसेच राजकीय फायद्यासाठी आपल्या पत्नीला सोडून देतात, जे आपल्या आई-बहिणींना न्याय देऊ शकत नाहीत, ते देशाला काय सन्मान देणार, असा सवाल मायावतींनी केला.

अलवर येथे झालेल्या सामुहिक बलात्काराबद्दल ही प्रश्न केला, मोदींनी याबाबत मौन धारण केले असून, केवळ आपल्याला मिळणारी मते वाया जाऊ नयेत यासाठी ते या विषयावर काही बोलत नाहीत. तसेच त्यांचे दलितांबद्दलचे प्रेमही खोटे आहे, असा आरोप मायावतींनी केला. 
 
Web Title: Narendra Modi respect others sisters, wives when he left his own wife for political gains says Mayawati

संबंधित बातम्या

Saam TV Live