महावितरणचा वीज ग्राहकांना शॉक, वीज बिलात सवलतीची शक्यता मावळली

साम टीव्ही
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020
  • महावितरणचा वीज ग्राहकांना शॉक
  • थकबाकी करणार वसूल
  • वीज बिलात सवलतीची शक्यता मावळली

कोरोनाकाळातल्या थकीत वीज बिलांची वसुली करण्याचे आदेश महावितरणने दिलेत. त्यामुळे सवलतीच्या आशेवर असलेल्या वीज ग्राहकांना जोरदार श़ॉक बसणारेय.

कोरोना काळात वीज ग्राहकांना आलेल्या अव्वाच्या सव्वा वीजबिलांतून सवलत मिळण्याची शक्यता मावळलीय. कारण कोरोना काळातल्या वीजबिल वसुलीचे आदेश महावितरणने दिलेत. महावितरणने त्याबाबतचं परिपत्रकच जारी केलंय.

दरवाढीनंतर वसुलीचा शॉक
डिसेंबर 2020 पर्यंत कोरोना काळातली थकबाकी आणि चालू वीजबिलाची वसुली होणारेय. 1 एप्रिलपासून 64 लाख 52 हजार ग्राहकांनी वीजबिलाची कोणतीही रक्कम आजपर्यंत भरलेली नाही. परिणामी, दैनंदिन खर्च भागवण्यातही अडचणी येतायत. त्यामुळे मिशन मोडवर थकबाकीची वसुली करण्यात येणार असून प्रत्येक अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातल्या वसुलीवर लक्ष ठेवणार आहे. तसंच बिलाच्या वसुलीसाठी ग्राहक मेळावे घेण्याचं नियोजन करण्यात आलंय. शिवाय ग्राहकांना टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्याची सुविधाही देण्यात येणार आहे.

खरंतर कोरोना काळातल्या वीज बिलात सवलती देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता. त्याचा मोठा गाजावाजाही सरकारने केला. मात्र सरकारी तिजोरीत असलेला खडखडाट पाहता तूर्तास तरी ग्राहकांच्याच खिशात हात घालण्याचा सोपा पर्याय सरकारने निवडलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live