यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

 

सोलापूर : आचारसंहितेचे कारण पुढे करुन सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी अंधारात घालवावी लागणार आहे.

 

सोलापूर : आचारसंहितेचे कारण पुढे करुन सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी अंधारात घालवावी लागणार आहे.

शासनाने यावर तोडगा काढावा, अन्यथा 23 किंवा 25 ऑक्‍टोबरला राज्यभरात एकही बस रस्त्यावर दिसणार नाही, असा इशारा एसटी कामगार संघटनेने शासनाला दिला आहे. राज्य सरकारी सेवेतील वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी, रमजान ईद, ख्रिसमस, पारशी नववर्ष, संवत्सरी, रोस-होशना, वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती), स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अग्रीम दिला जात आहे. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षी तो मिळालाच नाही. यावर्षीही आचारसंहितेचे कारण पुढे केले जात आहे.

दरम्यान, मागच्या वर्षीच्या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे वाढल्याचे कारणही दिले जात आहे; परंतु मूळ ग्रेड पे नुसार अग्रीम द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शासन व कर्मचाऱ्यांचा वाद ऐन दिवाळीत होणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार, असे चित्र दिसत आहे.

ठळक बाबी :-
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे साडेबारा हजारांचा फेस्टिवल ऍडव्हॉन्स मिळावा
- चार हजार 800 रुपयांपर्यंत ग्रेड पे असणाऱ्यांना साडेबारा हजारांची उचल मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- वेतन कराराच्या तरतुदीला राज्य शासन बगल देत असल्याचा संघटनेचा आरोप
- आंदोलन 23 की 25 ऑक्‍टोबरला करायचे यावर निर्णय होऊ शकला नाही.
- एसटी कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांकडून मागविला अभिप्राय
- कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांची उद्या (बुधवारी) मुंबईत बैठक

राज्य शासनाच्या 23 ऑक्‍टोबर 2019 च्या निर्णयानुसार चार हजार 800 रुपयांपेक्षा कमी ग्रेड पे असलेल्या वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपयांचे अग्रीम (फेस्टिवल ऍडव्हॉन्स) देणे आवश्‍यक आहे. मात्र, शासन आता आचारसंहितेचे कारण पुढे करत आहे. त्यामुळे 23 अथवा 25 ऑक्‍टोबरला आंदोलन करण्याबाबत दिशा ठरणार असून शासनाला तसे पत्रही दिले आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

Web Title: MSRTC employees will go on strike in Diwali


संबंधित बातम्या

Saam TV Live