ठाणे जिल्ह्यात सापडला ‘म्यूकरमायकोसिस’चा पहिला रुग्ण

Mucormicosis Patient found in Thane District
Mucormicosis Patient found in Thane District

ठाणे : कोरोनातून Corona बऱ्या झालेल्या एका ५६ वर्षीय महिलेच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत घेण्यात आलेल्या चाचणीत त्यांना ‘म्यूकरमायकोसिस’ आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णाला ठाणे जिल्हा Thane सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. mucormycosis Patient found in Thane District

कोरोनाग्रस्त महिलेचा उजवा डोळा Eye लाल झाल्याचे दिसून आले. जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी त्या महिला रुग्णांची तपासणी केली. त्यात त्यांच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आले. अन्य एका चाचणीत उजव्या डोळ्याच्या पेशींना सूज असल्याचे दिसून आले.

कोरोना संक्रमणामुळे रोग प्रतिकारशक्ती Immunity खालावलेल्या रुग्णांमध्ये हा आजार आढळून येत आहे. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत आहे. या आजाराचे सायनसमधून संक्रमण सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. डोळा कायमचा निकामी होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. म्यूकरमायकोसिस हा काळ्या बुरशी सारखा असतो. तो केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरड्यांमध्ये तसेच छातीतदेखील होऊ शकतो, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. रोगप्रतिकारशक्ती मुळात कमी असणाऱ्यांना, मधुमेह असलेल्यांना धोका अधिक आहे. अॅन्टिव्हायरल आणि स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कोरानानंतर त्यामुळे हे संक्रमण होते. mucormycosis Patient found in Thane District

लक्षणे अशी
वरच्या पापणीला सूज, ती खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, दोन वस्तू दिसणे, नाकावर सूज, नाक बुजणे, चेहऱ्यावर एका बाजूने सूज, डोळ्यांमध्ये वेदना ही या आजाराची लक्षणे आहेत.

आजार स्टेरोईडच्या वा प्रतिजैविकांच्या अतिसेवनामुळे झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर पुढील उपचारासाठी रुग्णाला मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात येणार आहे
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com