Breaking | Pune | लग्न करायला नका दिला म्हणून प्रियकराचा गळा चिरला

सागर आव्हाड
मंगळवार, 3 मार्च 2020
  • लग्न करत नाही, म्हणून प्रियकराचा गळा चिरला!
  • पुण्याच्या नऱ्हे गावातील धक्कादायक घटना
  • हत्येनंतर तरुणी स्वतः पोलिस ठाण्यात हजर

पुणे- लग्न करत नाही, म्हणून प्रेयसीने प्रियकराचा गळा चिरुन खून केलाय. पुण्यातील नऱ्हे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी तरुणी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली आणि तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. कोयत्याने गळा चिरुन हत्या केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हत्या करण्यात आलेला मुलगा हा सांगलीतील असल्याचं कळतंय.महंतेश बिराजदार असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. 

 

पाहा Video - Pune | एकतर्फी प्रेमातून गोळीबार करत तरुणीला धमकावलं

 

हत्या करण्यात आलेल्या महंतेश बिरााजदार याचं वर्ष 27 वर्ष आहे. तो मूळचा राहणारा सांगलीच्या जत तालुक्यातील संख या गावातील आहे. तर ज्या तरुणीनं त्याची हत्या केली, ती देखील सांगलीतील असल्याचं कळतंय. 24 वर्षीय तरुणीने लग्न न करण्याचा राग मनात धरुन ही हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.

 

पाहा Video - प्रेयसीने का केली प्रियकराची हत्या?

 

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सध्या पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अनुराधा करे असं आरोपी तरुणीचं नाव असून तिचं वय 24 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. 

 

पाहा Video - Nirbhaya Case | दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, कोर्टाचा मोठा निर्णय

 

हेही वाचा - अजित पवार विरोधकांना असं काही म्हणाले की एकच हशा पिकला

आजच्या हेडलाईन्स पाहिल्यात का?

 

 

muder pune girlfriend killed boyfriend crime Sangli Maharastra Marriage love 

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live