पायी वारीचा निर्णय तीन दिवसांत घ्या, अन्यथा....

येत्या तीन दिवसांत पायी वारीचा निर्णय घ्या नाहीतर मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे
पायी वारीचा निर्णय तीन दिवसांत घ्या, अन्यथा....
तुषार भोसले, भारतीय जनता पक्ष अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष- Saam Tv

मुंबई : येत्या तीन दिवसांत पायी वारीचा Pandharpur Wari निर्णय घ्या नाहीतर मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या BJP अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले Tushar Bhosale यांनी दिला आहे. यंदा पायी वारी काढण्यात येणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यावर भाजपने टीका केली आहे. BJP Leader Tushar Bhosale Warns Government over Pandharpur Wari

गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची वारी रद्द करण्यात आली होती. यंदाही पायी वारी न काढता एसटीने प्रमुख संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. याबाबत भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत तुषार भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती.

राज्यात वारीच्या निर्णयावरुन याच मुद्द्यावर महाराष्ट्रात आता राजकारण सुरु झाले आहे. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे. हा निर्णय जाहीर केल्यानंतर आळंदी व देहूतील ग्रामस्थ आणि राज्यातील वारकरी यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. निर्णय झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर वारकरी हे पायी वारी पालखी सोहळा घेण्यावर ठाम आहेत असे सांगण्यात येत आहे. BJP Leader Tushar Bhosale Warns Government over Pandharpur Wari

तुषार भोसले, भारतीय जनता पक्ष अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष
महाविकास आघाडी सरकारचे सगळं व्यवस्थित चाललंय - शरद पवार (पहा व्हिडिओ)

याबाबत बोलताना भोसले म्हणाले, "राज्यपालांच्या स्पष्ट सूचनेनंतरही मुख्यमंत्र्यांनी आडमुठी भूमिका घेतली. कारण हिंदुत्व विरोधी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली बाळासाहेबांच्या वाघाची मांजर झाली आहे. एकवेळ महाराष्ट्राची शेकडो वर्षाची पायी वारीची परंपरा खंडीत झाली तर चालेल, पण इटालियन हिंदू विरोधी अजेंडा टिकला पाहीजे, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका सगळा महाराष्ट्र पाहतोय. अजूनही वेळ गेलेली नसून येत्या 3 दिवसात पायी वारीचा निर्णय घ्या नाहीतर उद्भवणाऱ्या मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल. वारकऱ्यांचा निर्णय ठरलेला आहे, त्याची मोठी किंमत या सरकारला मोजावी लागेल,''

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.