टिपू सुलतान नामांतर वाद, गोवंडीत भाजप-सेनेत सोशल वॉर

टिपू सुलतान नामांतर वाद, गोवंडीत भाजप-सेनेत सोशल वॉर

मुंबई - राज्यात शिवसेना आणि भाजपा यांच्यात फाटाफूट झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन केलं. मात्र, तेव्हापासून शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय कलगीतुरा पाहायला मिळतो आहे.

आता वरीष्ठ नेतेमंडळींप्रमाणेच स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्येही अशाच प्रकारचा राजकीय कलह पाहायला मिळू लागला आहे. गोवंडीमधल्या एका उद्यानाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू झालाय. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या मागणीला भाजपाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. BJP-Shiv Sena dispute over renaming of Govandi park

गोवंडीमधील एका उद्यानाला शिवसेनेच्या एम-पूर्व प्रभाग क्रमांक १३६ मधील नगरसेविकेने टिपू सुलतान यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मात्र, त्यावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आलाय. त्यासाठी भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्यान समितीकडे एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र ट्वीट करताना मुंबई भाजपाने शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

“हिंदूंचा ज्याने क्रूर पद्धतीने छळ केला, अशा हिंदूद्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव वॉर्ड क्रमांक १३६ च्या उद्यानाला द्यावे, अशी शिवसेनेने मागणी केली आहे. जनाबसेनेच्या या चमत्कारिक मागणीविरोधात नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी बाजार व उद्यान समितीला पत्र लिहिले आहे”, असं ट्वीट मुंबई भाजपाकडून करण्यात आलं आहे.

भाजपा एका नावावरून राजकारण करत आहे. हिंदूंना भडकवण्याचा काम भाजप करत असून निवडणुका आल्या की हिंदू-मुस्लिमांमध्ये घाणेरडे राजकारण भाजप करत असल्याचे प्रत्युत्तर नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी दिलंय.

नवीन विमानतळाच्या नामकरणाचा वाद अजून शमलेला नाही. या विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. तर आगरी समाज दि.बा. पाटलांच्या नावावर ठाम आहे. त्यात हा नवा वाद समोर आला आहे.BJP-Shiv Sena dispute over renaming of Govandi park

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com