धक्कादायक : लसीकरण केंद्राच्या नावाखाली मुंबईत काळाबाजार

मुंबईमध्ये वॅक्सिनेशन सेंटरच्या नावाखाली काळाबाजार सुरू असल्याची घटना कांदिवलीत काल उघडकीस आली आहे
कोरोना लसीकरणाच्या नावाखाली मुंबईत काळाबाजार उघड
कोरोना लसीकरणाच्या नावाखाली मुंबईत काळाबाजार उघड- Saam Tv

मुंबई : मुंबईत वॅक्सिनेशन सेंटरच्या Vaccination नावाखाली काळाबाजार Black Marketing सुरू असल्याची घटना कांदिवलीत उघडकीस आली आहे. याच प्रकरणातील आरोपीने आता वर्सोवा परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध प्रोड्युसर संजय राऊतराय यांच्याकडूनही वॅक्सिनेशनच्या नावाखाली पैसे उकळल्याचे उघडकीस आले आहे. Black Marketing in the name of vaccination in Mumbai

अंधेरीच्या Andheri कोकीळाबेन रुग्णालया तर्फे वॅक्सिनेशन कँम्प आयोजित करून देण्याच्या नावाखाली आरोपी Accused संजय गुप्ता व राजेश पांडेने संजय यांच्याकडून २ लाख १२ हजार ४०० रुपये उकळले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी कोविडशिल्ड लसीच्या नावाखाली भेसळ युक्त द्रव्य संजय रहात असलेल्या रहिवाशी सोसायटीत १५१ जणांना दिले. तसेच नानवटी रुग्णालय येथे वॅक्सिन घेतले नसतानाही संबधित रुग्णालयाचे खोटे प्रमाण दिल्याची तक्रार संजय राउतराय यांनी दिली आहे.

हे देखिल पहा

या प्रकरणातील आरोपी संजय गुप्ता याला कांदिवली पोलिसांनी अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे.

या आरोपींनी अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे. त्याचा पोलीस तपास करत आहेत.

कोरोना लसीकरणाच्या नावाखाली मुंबईत काळाबाजार उघड
मलेशियन अभिनेत्रीवर बलात्कार प्रकरणात तामीळनाडूच्या माजी मंत्र्याला अटक

दरम्यान, कांदिवली बनावट लसीकरण प्रकरणी पालिकेचा सिरमला पत्र कांदिवली मधील सोसायटीमध्ये झालेल्या लसीकरणात वापरण्यात आलेल्या लसीचा कुपीचा उल्लेख करून हे पत्र देण्यात आलं आहे कांदिवली मधील सोसायटीत ही वापरण्यात आलेली लस ही सिरमची आहे का याच स्पष्टीकरण मागवली आहे पालिका आणि पोलीस या प्रकरणाची समांतर चौकशी करणार आहेत

Edited By - अमित गोळवलकर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com