Breaking : राज्यातील पोटनिवडणूकांच्या तारखा जाहीर

५ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्यातील पोटनिवडणूका होणार
Breaking : राज्यातील पोटनिवडणूकांच्या तारखा जाहीर

जिल्हा परिषद (jilha Parishad) आणि पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) पोटनिवडणूकांच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. येत्या ५ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्यातील पोटनिवडणूका होणार आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणूकांच्या तारखा जाहिर केल्या आहेत. राज्यातील नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत असलेल्या ३३ पंचायत समित्यांच्या पोट निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान (U.P.S Madan) यांनी याबाबतची माहिती दिली.

हे देखील पहा-

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, त्यामुळे ४८ तासांमध्ये तारीख जाहीर कराव्यात, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांच्या तारखा जाहिर केल्या आहेत. त्यानुसार येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल.

Breaking : राज्यातील पोटनिवडणूकांच्या तारखा जाहीर
पाेर्णिमा पाटलांना एक कोटी ३६ लाखांना फसविले; ५ जणांवर गुन्हा

येत्या १५ ते २० सप्टेंबर दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत. तर २१ सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी तर पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यसरकारने राज्यातील या पोटनिवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तर दूसरीकडे राज्यातील ओबीसी आरक्षणाचा वादामुळे निवडणूका पुढे ढकण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र न्यायालयाने राज्यसरकारले फटकारल्यामुळे निवडणूक आयोगाने त्वरीत हा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी समोर आली आहे.

- नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?

नंदूरबार -14

अकोला -28

धुळे -30

नागपूर -31

वाशिम -27

-किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?

अकोला – 14

वाशिम -14

धुळे – 15

नंदूरबार – 11

नागपूर -16

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com