'साम'चा दणका : बालविवाह प्रकरणी युवकासह कुटुंबियांवर गुन्हा

'साम'चा दणका : बालविवाह प्रकरणी युवकासह कुटुंबियांवर गुन्हा
marriage

परभणी : जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या मांजरथ या गावात झालेल्या बालविवाह प्रकरणी साम टीव्हीने आवाज उठविल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांसह नव-याच्या कुटुंबियांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद मुलीच्या मामा याने दिली आहे. (case-registered-on-mother-groom-nine-people-child-marriage-cae-parbhani)

या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री नऊ संशयितांच्या विरोधात गुन्हा झाला असून पाेलिस संशियतांचा शाेध घेत आहेत.

पाथरी तालुक्यातील मांजरथ येथे आई आणि तिच्या 13 वर्षाच्या मुलीला उसाच्या फंडात नेत 28 वर्षीय युवकासमवेत तिचा बळजबरीने बालविवाह marriage लावण्याचा धक्कादायक प्रकार घडला.

marriage
रेणके आयाेगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणकेंची प्रकृती स्थिर

हे प्रकरण साम टीव्हीने सर्वांत प्रथम प्रशासनाच्या नजरेस आणून दिले. त्यानंतर चाईल्डलाईनचे कर्मचारी आणि प्रशासनातील कर्मचा-यांनी गावात जाऊन संपुर्ण प्रकरणाची चाैकशी केली. त्यानंतर मुलीच्या मामाने संबंधितांविराेधात पाेलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी नऊ संशियतांच्या विरोधात बाल हक्क विवाह कायद्याचे कलम 9, 10 आणि 11 नुसार गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मुलीच्या आई-वडिलांचा, नव-या मुलावर, त्याची आईसह लग्न लावणा-या पुराेहितासह काही जणांचा समावेश आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com