चंद्रपूरातल्या बारमालकाने केली चक्क वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा

चंद्रपूर जिल्ह्यात दारूविक्री पुन्हा सुरू झाल्याचा आनंद तळीरामांसोबत दारू व्यावसायिकांनाही झाला आहे. या आनंदाने नुकतीच एक नवी उंची गाठली. एका बारमालकाने चक्क दारूबंदी उठविणारे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा केली
चंद्रपूरमधील बारमालकाने केली चक्क वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा
चंद्रपूरमधील बारमालकाने केली चक्क वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा- ANI

ANI

चंद्रपूर : तब्बल सहा वर्षांच्या काळानंतर चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील दारुबंदी (Liquor Ban) उठली खरी पण या-ना त्या कारणाने दारुबंदी गाजतेच आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूविक्री पुन्हा सुरू झाल्याचा आनंद तळीरामांसोबत दारू व्यावसायिकांनाही झाला आहे. या आनंदाने नुकतीच एक नवी उंची गाठली. एका बारमालकाने चक्क दारूबंदी उठविणारे पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या फोटोची पूजा केली. Chandrapur Bar Owner performed pooja of Vijay Wadettiwar Photo

सध्या हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे. बारमालकाने काउंटरच्या बाजूला दर्शनी भागात पालकमंत्र्यांचा (Guardian Minister) फोटो लावून केलेल्या आरतीचा हा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा तसेच टीकेचा विषय ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याचा निर्णय राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला. यानंतर जिल्ह्यातील मदिरालये एकापाठोपाठ एक सुरू होत आहे. दारुबंदी उठविल्यानंतर मद्यपींच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले आहे. Chandrapur Bar Owner performed pooja of Vijay Wadettiwar Photo

बार, वाइनशॅापमध्ये दररोज गर्दी वाढते आहे. अशातच विक्री सुरू झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी चंद्रपूर शहरालगत चंद्रपूर-मूल मार्गावर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिमा लावली गेली. या बारचे उद्‍घाटन अलीकडेच झाले आहे. उद्‍घाटनाच्या पहिल्याच दिवशी वडेट्टीवारांच्या प्रतिमेची साग्रसंगीत पूजा करण्यात आली. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे आहे.

चंद्रपूरमधील बारमालकाने केली चक्क वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा
छोटा राजन विरोधात क्लोजर अहवालाला न्यायालयाकडून मान्यता

भाजप सरकारच्या काळात एक एप्रिल २०१५ रोजी दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. दारूबंदीनंतर जिल्ह्यात अवैध धंदे वाढले. गुन्हेगारीत मोठी वाढ झाली. त्यामुळे दारुबंदी उठविण्याची मागणी सातत्याने होत होती. आमदार विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदी उठविण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले. २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर वडेट्टीवारांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. पद मिळाल्याबरोबर त्यांनी दारुबंदी उठवू, असे आश्वासन दिले होते. मे महिन्यात अखेर दारुबंदी उठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर जुलै महिन्यात जिल्ह्यातील दारुची दुकाने पुन्हा सुरू झाली. विक्री सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत तळीरामांनी अंदाजे एक कोटीची दारू रिचवल्याची माहिती आहे.

Edited By- Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com