Maharashtra Politics: माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफांना झोप येत नाही

ते किरीट सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा ठोकणार आहेत. त्यांनी 100 नाही 500 कोटींचा दावा दाखल करावा.
Maharashtra Politics:  माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफांना झोप येत नाही
Maharashtra Politics: माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफांना झोप येत नाही

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (GramVikas Mantri Hasan mushrif) यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. त्यांच्यावर कोणताही आरोप झाला की ते माझं नाव घेतात. माझं नाव घेतल्या शिवाय त्यांना झोप येत नाही. ते माझ्याविरोधातही दावा दाखल करणार आहेत. पण १९ महिने झोपले होते का, कोरोना काळात काळा पैसा गोळा करण्यात व्यस्त होतात का? असा सवालच विचारत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आहे.

हे देखील पहा-

ते किरीट सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा ठोकणार आहेत. त्यांनी 100 नाही 500 कोटींचा दावा दाखल करावा. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी त्यांना भरावी लागेल. त्यात काळा पैसा चालत नाही. दावा ठोकताना व्हाईट मनी लागतो, ब्लॅक मनी नाही, असा सणसणीत टोलाही चंद्र्कांत पाटील यांनी लागावला आहे.

निरदोष आहात तर घाबरता कशाला आम्ही आरोपांना घाबरत नाही. मुश्रीफांनी खुशाल तक्रार करावी, आमचे सर्व अर्ज भरु जालेत, आमचे सर्व उमेदवार ओबीसीच असतील. आम्ही पोटनिवडणूकांसाठी सज्ज आहोत.

यवतमाळ: पोलीस अधीक्षकांचा दातृत्वपणा; 10 अनाथ बालकांच्या नावे प्रत्येकी दहा हजार

आम्ही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असा आरोप त्यांनी केला. त्यांचं सरकार फेव्हिकोल चं सरकार आहे. मग कशाला एवढी भीती? असेही चंद्रकांत पाटील यांनी विचारले आहे. गुजरात मध्ये मुख्यमंत्री बदल यात काही गैर नाही. हे भाजपचं करू शकतो. विरोधी पक्षांना तर राष्ट्रीय अध्यक्ष देखील नाही. अखेर निवडणूक आयोगाने त्याबाबत विचारणा केली.

महिला अत्याचाराच्या बाबतीत मुख्यमंत्री बोलत नाहीत। महिला आयोगाला अध्यक्ष नाही याचं उत्तर द्यावं. काहीही झाल की महाविकास आघाडीचे नेते उत्तर प्रदेश आणि हाथरस विषयी बोलतात. महाराष्ट्रात काय घडते त्यावर बोलत नाहीत.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com