सत्य परेशान हो सकता है पराजित नही: छगन भुजबळ भावूक

८०० कोटींच्या कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह ८ जणांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सत्य परेशान हो सकता है पराजित नही: छगन भुजबळ भावूक
सत्य परेशान हो सकता है पराजित नही: छगन भुजबळ भावूक

सत्य परेशान हो सकता है पराजित नही, असे म्हणच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ८०० कोटींच्या कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह ८ जणांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे देखील पहा-

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्ष तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती. आज त्यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आज दुखाचा पाढा वाचणार नाही. पण तुमचा भुजबळ करु असे बोलणाऱ्यांनाही न्यायालयाने उत्तर दिले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आमच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले. कंत्राटदाराला १ ही पैसा दिल्याचं विरोधी पक्षाला सिद्ध करता आलं नाही. तक्रारदाराला १ फुट जमीन किंवा एफएस आय मिळाली नाही, तरीही आमच्यावर आरोप करण्यात आले, ८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. ईडी, सीबीआयची केस झाली, २६ महिने तुरुंगात रहावं लागलं. पण आज न्यायालयाचा निर्णयाचा आम्ही विनम्रपुर्वक स्विकार आहोत. द्वेष तक्रार नाही. असे म्हणत त्यांनी या प्रकरणाच्या निकालावर भाष्य केले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com