नागपूर की वासेपुर ?- ऑरेंज सिटीची ओळख होतेय क्राइम सिटी (पहा व्हिडिओ)
नागपूर की वासेपुर? शहरात गुन्हेगारी वाढतेय- Saam Tv

नागपूर की वासेपुर ?- ऑरेंज सिटीची ओळख होतेय क्राइम सिटी (पहा व्हिडिओ)

ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या उपराजधानी नागपूरची ओळख क्राइम सिटी अशी झालीय. नागपूर आहे की वासेपुर असा प्रश्न निर्माण झालाय

नागपूर : ऑरेंज सिटी Orange City अशी ओळख असलेल्या उपराजधानी नागपूरची Nagpur ओळख क्राइम सिटी अशी झालीय. नागपूर आहे की वासेपुर Wasepur असा प्रश्न निर्माण झालाय. गेल्या सहा महिन्यात नागपूर Nagpur जिल्ह्यात 52 खुनाच्या घटना घडल्याय तर गेल्या जून महिन्यात 19 घटना घडल्याय. बलात्कार, अपहरण, घरफोड्या यातर नित्याचाच झाल्या आहेत. त्यामुळं नागपूरात कायद्याचं Law राज्य आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय. Crime in Nagpur Increasind Day by Day

नागपूरात काल पांढराबोडी भागात एका गुंडाचा दगडांनी ठेचून खून Murder करण्यात आला. अवैध दारूच्या तस्करीतून ही हत्या करण्यात आली. या घटनेच्या एक दिवस आधी एका टिक टॉक स्टार नं आपल्या मैत्रिणीचे अपहरण करून तुला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा केला होता.

या आणि अशा घटना सातत्यानं नागपूरात घडताहेत. सहा महिन्यांचा विचार केल्यास जिल्ह्यात 52 खून झालेत. तर गेल्या जून महिन्यात 19 खुनाच्या घटनांनी नागपूर हादरलं होतं. त्यामुळं नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मात्र, गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी नागपूर पोलीस ऍक्शन मोड मध्ये असल्याचा दावा नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं.Crime in Nagpur Increasind Day by Day

नागपूर की वासेपुर? शहरात गुन्हेगारी वाढतेय
शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची 'राणेनीती'

गेल्या भाजप सरकारच्या काळात गृहमंत्री नागपुरचे होते. महाविकास आघाडी सरकारमध्येही सुरुवातीला गृहमंत्री नागपूरचेच होते. मात्र, तरीही नागपूरची गुन्हेगारी कमी झाली नव्हती. आता ती आणखीनच वाढली आहे. गुन्हेगारांचं धाडस वाढत चाललंय. क्षुल्लक कारणांसाठी खून होतोय. त्यामुळं शहरात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com