अनिल देशमुखांचे पूत्र सलिल यांनाही 'ईडी; बजावणार समन्स?

ईडीकडून लवकरच अनिल देशमुख यांचे दुसरे पुत्र सलील देशमुख यांना समन्स जाण्याची शक्यता आहे
अनिल देशमुखांचे पूत्र सलिल यांनाही 'ईडी; बजावणार समन्स?
अनिल देशमुखांचे पूत्र सलिल देशमुख यांनाही ईडी बजावणार समन्स- Saam Tv

मुंबई : ईडीकडून ED लवकरच अनिल देशमुख Anil Deshmukh यांचे दुसरे पुत्र सलील देशमुख Salil Deshmukh यांना समन्स Summons जाण्याची शक्यता आहे. सलील देशमुख यांच्या कंपनीने उरण Uran तालुक्यात खरेदी केलेल्या करोडो रुपयांच्या जमिनीचा तपास ईडीने सुरू केला आहे. त्याच संदर्भात हे समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. ED to summon Salil Deshmukh

उरण तालुक्यातील धुटूम गावात सलील देशमुख यांची गुंतवणुक असलेल्या प्रीमियर पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 15 प्लॉट खरेदी केलेत ज्यांची किंमत 300 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती मिळते आहे. ही जागा ८.३ एकर इतकी असून पळस्पे फाटा ते जेएनपिटी या परिसरात आहे.

ईडीकडून सुरू असलेल्या तपासात जमीन खरेदी करणारी कंपनी ही सलील देशमुख चालवत असल्याचं समोर आले असून त्याअनुषंगाने लवकरच त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. ED to summon Salil Deshmukh

दरम्यान, मुंबईचा बडतर्फ पोलिस अधिकारी सचीन वाझेने तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांना बार मालकाकडून वसूल केलेले ४ कोटी ७० लाख रुपये दिल्याची माहिती खुद्द वाझेनेच ईडीला दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. देशमुख म्हणजेच नंबर १ होते असे वाझेने ईडीच्या चौकशीत सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.

अनिल देशमुखांचे पूत्र सलिल देशमुख यांनाही ईडी बजावणार समन्स
Breaking - ठाण्यात शिवसेना नेत्याचा होणार काँग्रेसमध्ये प्रवेश

बार मालक जया पुजारी आणि महेश शेट्टी या दोघांनीही गुड लक मनी म्हणून डिसेंम्बर महिन्यात ४० लाख वाझेला दिले होते. जे देशमुखांना दिल्याचे वाझेने ईडी चौकशीत मान्य केले आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने केलेल्या चौकशीत आतापर्यंतच्या तपासात ५० ते ६० करोड रुपयांच्या व्यवहारांची माहिती मिळाली आहे. यातील काही पैसे हे वाझे सीआययुमध्ये करत असलेल्या हायप्रोफायईल प्रकरणांच्या तपासादरम्यान जमवण्यात आल्याचाही ईडीला संशय आहे.

ईडीने कोर्टाची परवानगी घेऊन तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेची चौकशी केली आहे. त्या चौकशीदरम्यान वाझेने या गोष्टी सांगितल्या आहेत अशी सूत्रांची माहिती आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com