Breaking : अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचा पुन्हा छापा

Breaking : अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचा पुन्हा छापा
अनिल देशमुख- Saam Tv

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडी ED चा छापा पडला आहे.नागपूर Nagpur जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. ED Raids Anil Deshmukh Residence again

या ठिकाणी ईडी च्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम Search Operation सुरू आहे. या छाप्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. १६ जुलै रोजी ईडीने अनिल देशमुख यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली. यावेळी तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत ४. २० कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com