चिपळुण : 70 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले; शाळांत ठेवणार

चिपळुण : 70 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले; शाळांत ठेवणार
chiplun flood

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस आणि बुधवारी रात्री पडलेल्या पावसामुळे खेड व चिपळूण शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरुन जाऊ नये तातडीने बचाव कार्य सुरु केले आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेवट्टीवार यांनी नमूद केले. दरम्यान आत्तापर्यंत 70 ते 75 नागरिकांना सुरक्षित स्थळी पाेचविले आहे. एका वेळेस 25 लाेकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी उपाययाेजना राबविण्यात येत आहेत (flood-in-chiplun-ratnagiri-rescue-operations-ndrf-vijay-wadettiwar)

दरम्यान शक्य तितक्या लवकर हेलिकॉप्टर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे असे मंत्री वडेवट्टीवार यांनी नमूद केले.

पूराच्या पाण्यामुळे चिपळूण chiplun flood येथे भयानक परिस्थिती निर्माण झाली. संपुर्ण शहर पाण्याने वेढले गेले आहे. अन्य जिल्ह्यातून हाेणारी वाहतुक संपुर्णतः थांबविण्यात आली आहे. पुरामुळे या भागात मदत कार्य करण्यासाठी सर्वताेपरी सूचना करण्यात आल्या आहेत अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ते म्हणाले एनडीआरएफच्या दोन पथकांमार्फत बचाव कार्य हाेईल. तटरक्षक दलाच्या मदतीने बोटी उपलब्ध केल्या जाणार आहेत. पालिकेच्या बाेटींच्या माध्यमातून सध्या बचाव कार्य सुुर आहे.

खाद्यपदार्थांची पाकिटे आणि वैद्यकीय मदत पुरविली गेली आहे. शक्य तितक्या लवकर हेलिकॉप्टर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन परिस्थितीकडे लक्ष देणारी आहे.

स्थानिक चिपळूण नगरपालिका 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालु आहे. रत्नागिरीमधून 1 , पोलिस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अशा तीन बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविणेत आल्या आहेत. पुणेहुन NDRF च्या दोन पथक पुणे (खेड साठी 1 व चिपळूणसाठी 1) रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत.

सध्या एनडीआरएफचे पथक कुंभार्ली घाटापर्यंत पाेचले आहे. त्यांच्या दहा बाेटींच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात येईल. आवश्यकता भासली तर नागरिकांना एअर लिफ्ट करा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान नागरिकांना शाळा आणि संस्थामध्ये ठेवले जाणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com