12वी मूल्यांकनासाठी CBSE कडून 30-30- 40 चा फॉर्म्युला

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आणि भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (ISCE)आज (17 जून) सर्वोच्च न्यायालयात इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन प्रणाली सादर केली.
12वी मूल्यांकनासाठी  CBSE कडून 30-30- 40 चा फॉर्म्युला
Supreme CourtCanva

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आणि भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (ISCE)आज (17 जून) सर्वोच्च न्यायालयात इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन प्रणाली सादर केली. अॅटर्नी जनरल (AG) के के वेणुगोपाल यांनी न्यायालयासमोर 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन प्रणाली सादर केली. तर येत्या 31 जुलै रोजी न्यायालय या प्रकरणी अंतिम निकल जाहीर करणार आहे. (Formulation of 30-30-40 from CBSE for 12th assessment submitted to the court)

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात दहावी - बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही घेतला. मात्र विद्यार्थ्याच्या निकालाबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत केंद्रीय शिक्षण मंडळाच्या वतीने निकालाबाबत निर्णय घेण्यासाठी 13 सदस्यांची एक समिती गठीत कऱण्यात आली आहे. या समितीने हा मूल्यमापनाचा फॉर्म्युला सादर केला आहे.

  • सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या मूल्यांकन मूल्यांकनाचे मुख्य मुद्दे

- "एखाद्या विद्यार्थ्याचे मूल्यांकन करण्यासाठी, दहावीचे 30%, 11वीचे 30 आणि 12 वीचे 40% असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.

- म्हणजेच विद्यार्थ्यानी इयत्ता 10वी मध्ये केलेल्या कामगिरीवर 30 टक्के मार्क, 11 वी मध्ये केलेल्या कामगिरीवर 30 टक्के मार्क आणि 12 वी मध्ये केलेल्या शैक्षणिक वर्षाच्या कामगिरीवर 40 टक्के गुण देण्यात येतील.

- या मूल्यांकनासाठी सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. तसेच बारावीसाठी युनिट, टर्म व प्रॅक्टिकलमध्ये मिळविलेले गुण विचारात घेतले जातील.

- 30 टक्के गुण असतील ते 11 वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले 40 टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि प्रिलिम परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.

दरम्यान, जे विद्यार्थी या गुणांवर समाधानी नसतील ते विद्यार्थी कोरोनाची परिस्थिती पाहता, शाळेने नियोजित केलेल्या वेळेप्रमाणे उपस्थित राहून परीक्षा देऊ शकतात आणि त्यांचे मार्क सुधारू शकतात.

Edited By- Anuradha Dhawade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com