लोअर दूधना प्रकल्पाचे चौदा दरवाजे उघडले; दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग

लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या खालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. नदीपात्रात उतरु नये, गुरेढोरे, विद्युत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे असे आवाहन पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.
लोअर दूधनाचे १४ दरवाजे उघडले
लोअर दूधनाचे १४ दरवाजे उघडले

विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्री व बुधवारी (ता. १४) रोजी जोरदार पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर आवक सुरु असल्याने या धरणाच्या १४ दरवाज्यातून १४ हजार २८० क्युसेसने दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारपासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जलाशयात एकूण ८३ टक्के जलसाठा झाला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा लवकरच होऊ शकतो. धरणाचे द्वार क्र.०१, ०२, ०३, ०४, ०५, ०६, ०७ व १४, १५, १६, १७, १८, १९, २० हे चौदा द्वार ०.३० मीटरने उघडण्यात आले.

हेही वाचा - अधिका-यांनंतर सांगलीचे व्यापारी उतरले रस्त्यावर; निदर्शने सुरु

१४,२८० क्यूसेक्सने दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या खालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. नदीपात्रात उतरु नये, गुरेढोरे, विद्युत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे असे आवाहन पूर नियंत्रण कक्षाने केले आहे. लोअर दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक सुरु झाली असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता सतिश बागले दिली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com