तिकीट तपासणी..आठ महिन्‍यात शंभर कोटींचा दंड वसूल

तिकीट तपासणी..आठ महिन्‍यात शंभर कोटींचा दंड वसूल
तिकीट तपासणी..आठ महिन्‍यात शंभर कोटींचा दंड वसूल
Railway

भुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेने १ एप्रिल ते ६ नोव्हेंबर २०२१ दरम्यान तिकीट तपासणीत १००.८२ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. यात अनियमित प्रवास करणाऱ्या २९ हजार १९ प्रवाशांकडून १७.२२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. (jalgaon-news-centra-railway-Ticket-inspection-fine-of-hundred-crore-recovered-in-eight-months)

Railway
अमरावती : संचारबंदीतून आज पाचव्‍या दिवशी चार तासांची सूट

मध्य रेल्वेचे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी व विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी नियमित प्रयत्न होत आहे. मेल एक्स्प्रेस व स्पेशल गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम गांभीर्याने राबविण्यात येत आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट काढून व कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

भुसावळ विभागात सर्वाधिक दंड

मध्य रेल्वेने शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करत प्रवाशांना प्रवासादरम्यान सुरक्षित व जागरूक केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत भुसावळ विभागाने ४.६८ लाख प्रकरणात ३३.७४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. मुंबई विभागाने ६.८३ लाख प्रकरणात ३३.२० कोटी रुपये, नागपूर विभाग २.५१ लाख प्रकरणात १६.७३ कोटी आणि सोलापूर, पुणे विभागात ३.२० लाख प्रकरणात १७.१५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

विशेष पथक

१ एप्रिल ते ६ नोव्हेंबरदरम्यान तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकांनी कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या २९ हजार १९ प्रकरणात हा दंड वसूल केला. तोंडावर मास्क, फेस कव्हर न घातलेल्या २३ हजार ८१६ प्रकरणे, कोविड निर्देशांचे पालन न करणाऱ्या पाच हजार २०३ प्रकरणे, अशी एकूण अनुक्रमे ३९.६८ लाख रुपये आणि २६.०२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com