डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड; १५ सप्टेंबरला आरोपींवर दोषारोप निश्चित होणार

१५ सप्टेंबरला दाभोलकर हत्याप्रकरणात सहभागी आरोपींवर आरोप पत्र निश्चित केले जाणार असल्याचे न्यायाधीश एस. नावंदर यांनी स्पष्ट केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड; १५ सप्टेंबरला आरोपींवर दोषारोप निश्चित होणार
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड; १५ सप्टेंबरला आरोपींवर दोषारोप निश्चित होणार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Andhashradhha Nirmulan Samiti) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. डॉ. दाभोलकारांच्या हत्या प्रकरणातील ५ आरोपींनी वकील आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्याची मुदत देण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ती मान्य केली आहे. या प्रकरणी आता या पाच आरोपींवर 15 सप्टेंबरला आरोप निश्चित होणार आहेत.

हे देखील पहा-

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप करण्यात आले आहेत. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी युक्तीवाद केला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड; १५ सप्टेंबरला आरोपींवर दोषारोप निश्चित होणार
समितीला आढळले मुदत संपलेले ओआरएस व औषधी; नंदुरबार जिल्‍ह्यातील धक्‍कादायक प्रकार

आज झालेल्या सुनावणीत आरोपी सचिन अंदुरे, विरेंद्रसिंह तावडे, ऍड संजीव पुनाळेकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर होते. तर आरोपी विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होता. तर आरोपी शरद कळसकर अनुपस्थित होता. यावेळी आरोपींना त्यांच्यावरील गुन्हे कबूल आहेत का? असे विचारले. त्यावर त्यांनी कोरोनामुळं वकिल आणि कुटुंबियांशी संपर्क साधता आला नसल्याचे सांगितले. तसेच, त्यासाठी त्यांनी मुदत मिळण्याची विनंती केली. न्यायालयानेही ती मान्य केली. १५ सप्टेंबरला दाभोलकर हत्याप्रकरणात सहभागी आरोपींवर आरोप पत्र निश्चित केले जाणार असल्याचे न्यायाधीश एस. नावंदर यांनी स्पष्ट केले. मात्र आणखी मुदत वाढ देता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com