Breaking: एनआयए कडून प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा

एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर छापा टाकला आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
Breaking: एनआयए कडून प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा
प्रदीप शर्माSaam Tv

एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर छापा टाकला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहेत. The NIA raid on Pradeep Sharmas house today morning

सीआरपीएफच्या ८ ते १० कंपन्या प्रदीप शर्मा यांच्या घराजवळ तैनात आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर आहेत. आज सकाळी सहाएनआयए कडून प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.

प्रदीप शर्मा
स्वबळाचे अजीर्ण : शिवसेनेचा नाना पटोलेंना टोला

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निवृत्त पोलिस अधिकरी प्रदीप शर्मा याच्या घरी एनआयएने कारवाई करत छापा टाकला आहे. या प्रकरणात या पूर्वी शर्मा यांची सलग दोन दिवस चौकशी झाली होती. त्यावेळी शर्मा यांचा मोबाइलही ताब्यात घेण्यात आले होते असे सूत्रांनी सांगितले आहे.

हे देखील पहा -

या प्रकरणात काही दिवसांपूर्वी एनआयएने संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली आहे. संतोष हा शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही एनआयएने चौकशीला बोलावले होते. या प्रकरणात विनायक शिंदे आणि वाजे यांची अंधेरीत मिटिंग झाल्याचे बोलले जात आह. त्यावेळी माजी पोलिस अधिकारी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com