अजित पवारांच्या उपस्थितीतच भाऊगर्दी; १५० जणांवर गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात काल झालेली गर्दी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात काल झालेली गर्दी- Saam TV

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Offence Registred against NCP Party Workers in Pune

पुण्यात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या या कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार Ajit Pawar यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्याची दखल पोलिसांनी घेतली आहे.

उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. याची दखल आता पोलिसांनी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके त्यांच्यासह शंभर ते दीडशे महिला आणि पुरुष पदाधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Offence Registred against NCP Party Workers in Pune

हे देखिल पहा

पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्याने त्यांच्या उपस्थितीतच अशाप्रकारे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात काल झालेली गर्दी
प्रताप सरनाईकांचा उद्धव ठाकरेंवर 'लेटर बाँब'

''गाडीतून उतरत असताना मनात विचार आलेला तसच जावं

. मी प्रशांतला (शहराध्यक्ष) सांगितलं होतं हा कार्यक्रम साधेपणाने करा. धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही अशी माझी अवस्था झाली आहे. मी पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो,'' असे काल या कार्यक्रमानंतर अजित पवार म्हणाले होते.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com