BJP खासदाराच्या सुनेचा छळ; रुपाली चाकणकरांकडे मागितली मदत

रामदास तडस यांच्या सुनेला मारहाण आणि छळ होत असल्याचा आरोप रुपाली चाकणकरांनी केला आहे
BJP खासदाराच्या सुनेचा छळ; रुपाली चाकणकरांकडे मागितली मदत
BJP खासदाराच्या सुनेचा छळ; रुपाली चाकणकरांकडे मागितली मदत Saam Tv news

राज्याच्या राजकारणात (Politics) अलीकडे दररोज काहीना काही ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. तीन- चार दिवसांपुर्वी पुण्यातील महिला सरपंच गौरी गायकवाड (Gauri Gaikwad) यांना मारहाण झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. मात्र त्याची कोणीही दखल घेतली नाही. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत भाजपा (BJP) उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गौरी गायकवाड यांची भेट घेतली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरणांवर (Rupali chakankar) टिकास्त्र डागलं.

हे देखील पहा-

मात्र आता रुपाली चाकणकरांनी एक ट्विट करत वर्ध्यातील भाजपा खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तडस यांच्या सुनेने चाकणकरांकडे मदत मागितली आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडीओद्वारे माहिती दिली.

रामदास तडस यांच्या सुनेला मारहाण आणि छळ होत असल्याचा आरोप रुपाली चाकणकरांनी केला आहे. तसेच, आज सकाळी मला एक पुजा नावाच्या मुलीचा मेसेज आला आणि तो मेसेज वाचून पुर्ण होत नाही तोपर्यंत मला तिचा फोनही आला. असे सांगत रुपाली चाकणकरांनी पुजा आणि त्यांच्यातील संभाषणाबाबत माहिती दिली. मी पुजा बोलतेय, माझ्या जिवाला धोका आहे. मी आज पोलीसांत तक्रार करणार होते पण तडस कुटुंबियांकडून माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. असे पुजा यांनी चाकणकरांकडे मला इथून घेऊन चला, असा असे सांगितले.

त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. तसेच त्यांच्या पदाधिकारी व पोलिस सरंक्षणासाठी पुजा यांच्याकडे पोहचले असल्याचीही माहिती दिली. तसेच पूजाला त्रास देणाऱ्या तडस कुटुंबियांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com