राज ठाकरे म्हणतात....महापालिकेसाठी एक प्रभाग पद्धतीच हवी

बहुसदस्यीय प्रभाग समितीतून मतदारांसमोर तीन-चार पर्याय ठेवण्यापेक्षा एक सदस्यीय प्रभाग समिती पद्धत असावी, असे स्पष्ट मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे
राज ठाकरे म्हणतात....महापालिकेसाठी एक प्रभाग पद्धतीच हवी
राज ठाकरे- Saam TV

नाशिक : बहुसदस्यीय प्रभाग समितीतून मतदारांसमोर Voters तीन-चार पर्याय ठेवण्यापेक्षा एक सदस्यीय प्रभाग समिती पद्धत असावी, असे स्पष्ट मत मनसेचे MNS अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी व्यक्त करत शहर विकासासाठी हेच योग्य असल्याचा दावा केला. Raj Thackeray advocates single ward system

तीन दिवसांच्या नाशिक Nashik दौऱ्यावर आलेले श्री. ठाकरे ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. लॉकडाऊनमुळे Lock Down कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला नाही. गेल्या महिन्यात ते नाशिकमध्ये आले होते, परंतू त्यावेळी खासगी कार्यक्रम असल्याने वेळ देता आला नाही. परंतू दोन दिवसांपासून संघटना मजबुत करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या बैठकांमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

हे देखिल पहा-

दरम्यान, येत्या २७ जुलैला ठाकरे पुन्हा नाशिकला येणार असून, त्यावेळी देखील संघटना बांधणीसाठी बैठका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सायंकाळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, स्थानिक व एकच लोकप्रतिनिधी असेल तर प्रभागाचा योग्य प्रकारे विकास साधता येतो. मतदारांना एकाच प्रभागासाठी चारदा मतदान करण्यास भाग पाडणे योग्य नाही. Raj Thackeray advocates single ward system

महाविकास आघाडी सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने शॅडो कॅबिनेटची घोषणा केली होती. परंतू लॉकडाऊनमुळे कॅबिनेटला हवे तसे काम करता आले नाही. नियुक्त केलेल्या शॅडो कॅबिनेटने चांगले काम केले. परंतू लोकांपर्यंत ते पोचले नसल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, शॅडो कॅबिनेट पुनर्जिवित करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

राज ठाकरे
Maharashtra Heavy Rain: मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळित

रविवारी (ता. १८) नाशिकमधील दौरा आटोपता घेत श्री. ठाकरे पुणे Pune येथे बैठकांना हजेरी लावणार आहे. त्यानंतर मुंबई व पुढे ठाणे Thane येथे संघटनात्मक बैठका घेतील. शहापूर येथे मनसेची शाखा अतिक्रमित ठरवून बंद करण्यासाठी स्थानिक प्रशासन पोचले. त्यावेळी पक्षाची सदस्य नसतानाही एका महिलेने पुढाकार घेत शाखा वाचविली होती. त्यामुळे शहापुर येथील त्या महीलेची ते भेट घेणार आहेत. Raj Thackeray advocates single ward system

प्रकल्प वाचविण्याची नाशिककरांची जबाबदारी

मनसेच्या सत्ताकाळात शहरात रिंग रोड, बोटॅनिकल गार्डन, संगीत कारंजा, शस्र संग्रहालय, उड्डाण पुलाखालील सुशोभिकरण आदी महत्वाचे प्रकल्प सामाजिक दायित्वाच्या निधीतून झाले. या प्रकल्पांची दुर्दशा झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने पालिका प्रशासनाला अनेकदा कळविण्यात आले. परंतू, पक्षीय राजकारणामुळे दुर्लक्ष केल्याचे सांगताना ठाकरे यांनी प्रकल्पांचे संवर्धन करण्याची जबाबदारी नाशिककरांची देखील असल्याचे मत व्यक्त केले. प्रकल्पांची वाताहात करणाऱ्यांचा नाशिककरांनी मतदानावेळी विचार करावा, मतदान करताना लक्ष्मीदर्शनासारखे प्रकार होत असतील तर, यापेक्षा वेगळे काय होणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com