Raju shetti: कोल्हापूरातील पुरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा

मात्र याच नद्यांच्या पुरामुळे आमचं आयुष्य उद्धवस्त व्हायची वेळ आली आहे.
Raju shetti:  कोल्हापूरातील पुरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा
Raju shetti: कोल्हापूरातील पुरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा

भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी, पंचगंगा या नद्या एकत्र येतात. या नद्या कोल्हापूरच्या (Kolhapur) जीवनदायीनी आहेत. मात्र याच नद्यांच्या पुरामुळे आमचं आयुष्य उद्धवस्त व्हायची वेळ आली आहे. कोल्हापूरला गेल्या १५ वर्षात ५ वेळा पाऊस आला. खोदकामामुळे, रस्त्यांच्या कामामुळे दरडी कोसळू लागल्या आहेत. रस्ते पूल आणि भराव टाकून काम केल्याने कोल्हापूरला पुराचा धोका वाढला आहे. असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani Shetkari sanghatna) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्य सरकार आणि केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे.

हे देखील पहा-

प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी संगम परिक्रमा झाल्यानंतर नृसिंहवाडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राजू शेट्टी यांच्या नेतृत्तवात पंचगंगा परिक्रमा काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. नद्याची पात्र उथळ झाले आहेतअनेक ठिकाणी पूल बांधले आहेत, त्याला भराव टाकले आहेत, त्यामुळे पुराचं पाणी वाहून जात नाही, असे पूल महापुराला कारणीभूत ठरत आहेत, हे मानव निर्मित अडथळे आहेत. इतकेच नव्हे तर राज्याने, केंद्राने पाण्याच्या प्रवाहाचा शास्त्रोक्त अभ्यास केला नाही, ठेकेदाराच्या फायद्यासाठी काम केले. त्याचा फटका आम्हाला बसला. आतातरी आम्हा पुरग्रस्ताचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारकडे केली आहे.

Raju shetti:  कोल्हापूरातील पुरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा
नेता येण्यापुर्वीच कार्यकर्त्याने मारली कृष्णा नदीत उडी अन्...

महाराष्ट्रावर केंद्र सरकार अन्याय करत आहे. मे महिन्यात वादळ आलं त्यात कोकणात नुकसान झालं. गुजरातमध्ये नुकसान झालं. मात्र कोकणातील नुकसान येऊन कुणाला बघावं, अस वाटलं नाही. केंद्र सरकारकड आपत्ती निधी असतो तो नरेंद्र मोदी यांनी निर्माण केला नाही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केला आहे या फंडात लाखो कोटी रुपये जमले आहेत, त्यातील 1 हजार कोटी गुजरातला दिले पण महाराष्ट्राला कोणतीही मदत दिली नाही, असा आरोपही यावेळी राजू शेट्टी यांनी केला.

सत्याग्रहातून तरी सरकारला जाग येईल असा वाटलं होत, पण तसं काहीही झालंं नाही. आता तरी केंद्राने राज्याशी चर्चा करून पूर नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. नदी पात्रातील अतिक्रमणांमुळे आणि पूर परिस्थिती उद्भवली आहे. केंद्रीय आपत्ती निवारण निधी जवाहरललाल नेहरूंच्या दूरदृष्टीतून निर्माण झाला. कोल्हापुरातील महामार्ग पाण्याखाली जातायेत त्यावर तातडीनं उपाययोजना करायला पाहिजेत.पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून पुरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हायला पाहिजे. दोन तीन धरणांमध्ये पाणी अडवून पूर नियंत्रण करता येईल का यावर विचर व्हायला हवा. शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यायला हवे असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com