Rane vs Thackeray: एफआयआर रद्द करण्यासाठी राणेंची उच्च न्यायालयात धाव

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राणे यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्याचे आदेश जारी केले.
Rane vs Thackeray: एफआयआर रद्द करण्यासाठी राणेंची उच्च न्यायालयात धाव
Rane vs Thackeray: एफआयआर रद्द करण्यासाठी राणेंची उच्च न्यायालयात धाव Saam Tv news

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधातील एफआयआर दाखल करण्यात आली होती. ही एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका नारायण राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल केली आहे.

हे देखील पहा-

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर राज्यात नारायण राणेंच्या नेतृत्त्वात जन आशिर्वाद यात्रा काढण्यात आली. मात्र या यात्रेदरम्यान ते रत्नागिरीत असताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यातील शिवसेना समर्थक आणि भाजपा समर्थकांमध्ये चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला.

याचदरम्यान, नाशिकमध्ये शिवसेना समर्थकांनी राणेंच्या विरोधात पहिला पहिली तक्रार दाखल केली. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राणे यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्याचे आदेश जारी केले.

Rane vs Thackeray: एफआयआर रद्द करण्यासाठी राणेंची उच्च न्यायालयात धाव
Breaking! ह्रदय शस्त्रक्रियेसाठी वाझेकडून रुग्णालय बदलण्यासाठी अर्ज दाखल

अनेक नाट्यमय घडामोंडीनंतर राणे यांना 24 ऑगस्ट रोजी अटक झाली आणि मंगळवारी रात्री जामीन मंजूर झाला. राणे यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

जनआशिर्वाद यात्रेदरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मंगळवारी रात्री रायगडमधील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. राणे यांना 15 हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यांना 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी अलिबाग (रायगड) येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com