Saam Tv Impact - 'त्या' नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या शेतीचा पंचनामा!

मात्र नुकसान झाल्याची तक्रार देऊन देखील प्रशासनातील कोणताच अधिकारी याकडे फिरकला नाही.
Saam Tv Impact -  'त्या' नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या शेतीचा पंचनामा!
Saam Tv Impact - 'त्या' नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या शेतीचा पंचनामा!Saam Tv

विनोद जिरे

बीड -  महसूल अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीचे Farm पंचनामे केले आहेत. पाटबंधारे विभागाने Irrigation Department बांधलेला बंधारा, शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आणि हा बंधारा तुंबून परिसरातील शेतात पाणी घुसले, यामुळे शेतातील उभ्या पिकांसह जमिनी वाहून गेल्याचा प्रकार, बीडच्या Beed गेवराई तालुक्यात असणाऱ्या आम्ला गावात घडला होता.

मात्र नुकसान झाल्याची तक्रार देऊन देखील प्रशासनातील कोणताच अधिकारी याकडे फिरकला नाही. याचीच बातमी साम टीव्हीने दाखवली होती. या साम टीव्हीच्या बातमीने प्रशासन खडबडून जागे झाले आणि नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले. दरम्यान हा बंधारा शेतकरी नको म्हणत असल्याने यावर तोडगा काढू असे देखील प्रशासनातील अधिकारी म्हणाले आहेत.

हे देखील पहा -

आम्ला या गाव शिवारातून खराडी नावाची नदी जाते. या नदीवर पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून, कोल्हापुरी स्वरूपाचा बंधारा, गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी बांधलेला आहे. या बांधलेल्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणे तर लांबच, उलट या बंधाऱ्या लगत असणाऱ्या, जळपास 20 शेतकऱ्यांच्या, 20 ते 25 एक्कर शेतीला याचा फटका बसला आहे. शेतीसह उभी पिकं वाहून जात आहेत.

या बंधाऱ्याला व्यवस्थित दरवाजे नसल्याने आणि नदीतून वाहून आलेला कचरा, टाकाऊ पदार्थ इत्यादीमुळे बंधाऱ्याचे दार तुंबून, नदीचे पात्र बऱ्याच ठिकाणी फुटल्याने, हे पाणी या शेतकऱ्यांच्या शेतीत गेले आणि पूर्ण पिकांसह शेतं वाहून गेली. यामुळे या शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

Saam Tv Impact -  'त्या' नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या शेतीचा पंचनामा!
शेतकऱ्यांच्या मुळावर उठला बंधारा; उभ्या पिकांसह जमिनी गेल्या वाहून..!

दरम्यान या बंधाऱ्याच्या भिंती व्यवस्थित बांधाव्यात अन्यथा हा बंधारा आम्हाला नको, आमचे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई देण्यात यावी. पिकांचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र या मागणीची दखल प्रशासनाने किंवा पाटबंधारे विभागाने घेतली नाही. तर याचं विषयीची बातमी साम टीव्हीने दाखवली होती. या साम टीव्ही बातमीच्या दणक्याने, महसूल प्रशासनाच्या वतीने, पिकांसह शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. यामुळे दुबार पेरणीचे संकट असणाऱ्या या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, काहीसा आधार मिळणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com