Belgaum : 'बेळगाव महाराष्ट्राचे आहे की नाही एवढेच भाजपाने सांगावे'

बेळगाव महापालिका निवडणूकीत संजय राऊतांचा अहंकार हरला, अशी टिका विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
Belgaum : 'बेळगाव महाराष्ट्राचे आहे की नाही एवढेच भाजपाने सांगावे'
बेळगाव महाराष्ट्राचे आहे की नाही एवढेच भाजपाने सांगावे, राऊतांचा पलटवार saam Tv news

बेळगाव महापालिका निवडणूकीत मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांचा अहंकार हरला, अशी टिका विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. भारतीय जनता पक्षाने आगामी (BJP) गोवा (Goa) विधानसभा निवडणूकीचे (Election) प्रभारी (in-charge) म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती केली. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संजय राऊतांवर अशी घणाघाती टिका केली. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हे देखील पहा-

''महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या," असे म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.

बेळगाव महाराष्ट्राचे आहे की नाही एवढेच भाजपाने सांगावे, राऊतांचा पलटवार
BJP खासदाराच्या सुनेचा छळ; रुपाली चाकणकरांकडे मागितली मदत

दरम्यान, गोव्यातील जनता भाजपाला आगामी विधानसभा निवडणूकीत पुन्हा बहूमताने निवडून देणार असल्याची अपेक्षा यावेळी फडणवीसांनी व्यक्त केली. तसेच, गोव्यामध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता स्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्याच्या मंत्रिमंडळांनी गोव्यात चांगले काम केले आहे. तसेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात भाजपचं वेगळ स्थान निर्माण केलंय. तेव्हा मनोहर पर्रीकरांची कमतरता आगामी निवडणूकीच जाणवेल, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com