जालना जिल्ह्यात एटीएम चोराचा पाठलाग करताना पोलिसांकडून गोळीबार !
Jalana Crimeलक्ष्मण सोळुंके

जालना जिल्ह्यात एटीएम चोराचा पाठलाग करताना पोलिसांकडून गोळीबार !

जालना Jalna जिल्ह्यातील भोकरदन Bhokardan शहरातील भोकरदन-जाफराबाद रोड वर पोलिस आणि चोरांचा थरार पहायला मिळाला आहे. रेनॉल्ड कंपनीच्या डस्टर कार मधून एटीएम चोरले जात असल्याची माहिती परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या crime branch टीमला मिळाली होती

जालना : जालना Jalna जिल्ह्यातील भोकरदन Bhokardan शहरातील भोकरदन-जाफराबाद रोड वर पोलिस आणि चोरांचा थरार पहायला मिळाला आहे. रेनॉल्ड कंपनीच्या डस्टर कार मधून एटीम चोर जात असल्याची माहिती परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या crime branch टीमला मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरापासून त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकणात पोलिसांकडून चोरट्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. Shooting by police while pursuing an ATM thief

हे देखिल पहा

भोकरदन शहरातील जाफ्राबाद रोड वरील केळणा नदी पत्रावर या चोरांनी पोलिसांवर शस्त्र काढून वार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला, या आवाजाने परिसरात एकाच खळबळ उडाली होती.

भोकरदन शहरापासून बऱ्याच अंतरापर्यंत पोलिसांनी या चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, चोरट्यानी रेनॉल्ड डस्टर गाडी सोडून पळ काढला. अशी माहिती सामोर आली आहे, घडलेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे चोरटे भोकरदन शरातील आलापूर परिसरात लपले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला जात आहे.

Edited By - Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com