नांदेड- विष्णुपूरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले; 60 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

यंदा पहिल्यांदाच प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आलेत. सध्या 60 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुराचा धोका लक्षात घेता नदी काठच्या व आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल आहे.
नांदेड- विष्णुपूरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले; 60 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
विष्णुपूरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले.

नांदेड : रविवारी झालेल्या धुवांधार पावसामुळे नांदेड शहराजवळील गोदावरी नदी वरील विष्णुपुरी प्रकल्प 100 टक्के भरले आहे. पाण्याचा येवा वाढल्याने प्रकल्पाचे आता सहा आणि 13 आणि 14 क्रमांकाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

यंदा पहिल्यांदाच प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आलेत. सध्या 60 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुराचा धोका लक्षात घेता नदी काठच्या व आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल आहे.

हेही वाचा - औरंगाबाद येथील सातारा परिसरात राहणारे योगेश पडोळ हे पत्नी वर्षा, मुलगा श्रेयस व त्यांचे नातेवाईक रामदास शेळके चौघे जण कार ( एम एच २० सीएम १८७२) ने औंढा तालुक्यातील शेळके (पोटा ) येथे कार्यक्रम आले होते.

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 56.2 मि.मी. पाऊस

नांदेड : जिल्ह्यात सोमवार 12 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 56.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 134.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सोमवार 12 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 120.1 (162.5), बिलोली- 67.8 (160.4), मुखेड- 48.7 (125.2), कंधार- 65.1 (113.4), लोहा- 73.7 (121.7), हदगाव-34.2 (108.5), भोकर- 46 (133.2), देगलूर- 52.3 (111.1), किनवट- 10.4 (138.8), मुदखेड- 74.1 (142.7), हिमायतनगर-20.6 (115.5), माहूर- 2.5 (117.8), धर्माबाद- 76 (181.6), उमरी- 63.6 (180.8), अर्धापूर- 97.3 (144.2), नायगाव- 41.2 (141.2) मिलीमीटर आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com