Mulshi Fire: पाहणी करताच अभिनेता प्रवीण तरडे संतापला

सागर आव्हाड
मंगळवार, 8 जून 2021

मुळशीतल्या सरपंच, उपसरपंचाला विनंती केली कंपन्यांच्या आत जा आणि पाहा आपले भाऊबंध कसे काम करत आहेत.

उरवडे येथील एसव्हीएस अक्‍वा कंपनीला आग लागली. यात 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवरून मुळशी पॅटर्न फेम अभिनेते प्रविण तरडे यांनी संताप व्यक्त केला. अभिनेते प्रविण तरडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. कंपनीची छोटीशा जागा पाहून तरडे यांनी संताप व्यक्त करत सर्व नागरिक, सरपंचांनी इतर कंपन्यांना भेटी देऊन पाहणी करण्याचं आवाहन केलं.(mulshi fire Actor Praveen Tarde got angry while inspecting)

मुळशीतल्या सरपंच, उपसरपंचाला विनंती केली कंपन्यांच्या आत जा आणि पाहा आपले भाऊबंध कसे काम करत आहेत. नाहीतर असेच जळून मरतील महिन्याभरानी, वर्षांनी आणि आपण हा तमाशा पाहत बसायचा का? असा सवाल तरडे यांनी उपस्थित केला. तर प्राज इंडस्ट्रीजमध्ये मी 3 वर्षे कामाला होतो.

हे देखील पाहा 

या कंपन्यांचं फॅक्ट्री ले आऊट चांगलं आहे मग त्यांच्या शेजारी लागून असलेल्या कंपन्यांत ही व्यवस्था का नाही. 40 बाय 40 च्या ठोकळ्यात 38 माणसं काम करतात का कधी? 40 बाय 40 च्या ठोकळ्यात 10-12 केमिकलच्या मशीन्स आहेत आणि 38 माणसं कामाला. हे सगळं भयाण आहे.यात दोष कोणाला देणार अशी व्यवस्था असेल तर.  

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live