मुंबईची बार्ज दुर्घटना तेल काढण्याच्या लालचेपायी?

Saam Banner Template
Saam Banner Template

मुंबई - तौक्ते वादळामुळे Cyclone बुडालेल्या बार्ज Barge पी ३०५ बेकायदेशीर रित्या तेल Oil उत्खन्न Oil Extraction करत होते. त्याला तेल उत्खननाची परवानगीच नव्हती. बार्ज वरील मयत झालेल्या ७० हून आधिक लोकांचा अतिलालचीपणामुळे कोल्ड बल्डेड मर्डर Murder झाला आहे असा आरोप मनसेने maharashtra navnirman sena केला आहे.पी ३०५ चे संचालन करणाऱ्या एफकॉन्स आणि जहाज मालकावर तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिपिंग महासंचालक आणि ओएनजीसीवर आयपीसी ३०४अ अंतर्गत कारवाईची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे. Mumbai Barge Accident Oil Extraction

समुद्रात ONGC साठी तेल उत्खननाचे काम करत असलेल्या पी ३०५ तराफा व सबंधीत इतर जहाजातील झालेले मृत्यू हे तौक्ते वादळामुळे नाही तर तराफा मालक आणि संचालन करणाऱ्या एफकॉन्सच्या अतिलालचीपनामुळे व निष्काळजीपणामुळे झाले आहेत. या घटनेमुळे केवळ जहाजच नाही तर पर्यावरणाचेही मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खाते सर्वप्रथम समुद्रातील संस्थांना बदलत्या हवामानाविषयी जागरूक करत असते. तौक्ते वेळीही हेच झाले. ओएनजीसी सोबत किंवा ओएनजीसी साठी काम करत असणाऱ्या एल&टी व इतर कंपन्यांनी आपली जहाजे, तराफे १५ तारखे पर्यंत किनाऱ्यावर आणलेली असताना केवळ एफकॉन्स संचलन करत असलेलीच जहाजे समुद्रात का “कार्यरत” राहिली हा विषय आहे असे मनसेने म्हटले आहे.

हे देखील पहा -

दिवसावर उतपन्न आणि पगार असल्याने आधिक नफा कमवण्यासाठी पी ३०५ अंतिम क्षणापर्यंत समुद्रात कार्यरत होते.  पी-३०५ हे एक 'डंब बार्ज' म्हणजेच स्वत:हून न हलू शकणारे अपंग बार्ज आहे. त्यामुळे ते किनाऱ्यावर पोहचले की नाही हे तपासण्याची जबाबदारी ओएनजीसी, शिपिंग महासंचालक, एफकॉन्स आणि कंपनी मालक या चारहींची होती. परंतु या चौघांपैकी  दोघांनी म्हणजे बार्ज मालक व एफकॉन्सने अधिक नफा मिळवण्यासाठी सुचनांकडे पाठ फिरवली तर ओएनजीसी व शिपिंग महासंचालकांनी पाठपुरावा करण्याची तसदी घेतली नाही असा देखील आरोप मनसेने केला आहे. Mumbai Barge Accident Oil Extraction

दुसरी धक्कादायक बाब म्हणजे पी ३०५ ला तेल उत्खननासाठी भारतीय नौदलाच्या ODAG विभागाकडून NSE परवानगी घ्यावी लागते. एफकॉन्सला मिळालेल्या या NSE परवानगीची मुदत संपलेली होती. साहजिकच तेल क्षेत्रात काम करण्याचा अधिकार त्यांनी गमावलेला होता. मात्र तरीही त्यांनी तेलक्षेत्रात अतिक्रमण केले आणि आपले व्यावसायिक काम चालू ठेवले. जहाज मालक व एफकॉन्सच्या पैसे कमवण्याचा अतिहव्यासामुळे सरकारी मार्गदर्शक तत्वांना आधीच जलसमाधी देण्यात आली होती असे मनसेने म्हटले आहे.

तौक्तेमुळे जहाजावर काम करणाऱ्या लोकांना जलसमाधी मिळाली. पी३०५ मुळे तेल उत्खन्न करणाऱ्या जहाजांचे ऑडीट, कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाची पात्रता, साधनसंपन्नता, परदेशी जहाजांची वैधता, तेलाची काळेबाजारी हे सारेच मुद्दे पुढे आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना पी ३०५ व अन्य जहाजांसोबत झालेली दुर्घटना ही निसर्गनिर्मित नाही तर मानवी दुर्लक्ष आणि हव्यासाचा परिणाम असल्याचा दावा आणि आरोप करते आहे  आणि पी ३०५च्या मालक व एफकॉन्स सहित ओएनजीसी व शॉपिंग महा संचालकांवर भारतीय दंड संहिता ३०४अ प्रमाणे कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com