मुंबईतील मेकअप आर्टिस्टने केला कंगनाच्या बॉडीगार्ड विरोधात बलात्काराचा आरोप 

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 22 मे 2021

बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार Rape and unnatural atrocities केल्याचा  गुन्हा अभिनेत्री कंगना रणौतचा Kangana Ranout पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडे Kumar Hegde याच्यावर दाखल करण्यात आला आहे.

मुंबई:  बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार Rape and unnatural atrocities केल्याचा  गुन्हा अभिनेत्री कंगना रणौतचा Kangana Ranout पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडे Kumar Hegde याच्यावर दाखल करण्यात आला आहे.  मुंबई पोलिसांनी Mumbai Police मुंबईतील एका मेकअप आर्टिस्टने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. कुमार हेगडे याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळ जबरदस्ती बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आणि ५० हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. Mumbai based makeup artist alleges rape against Kanganas bodyguard

हे देखील पहा -

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतचे नाव पुन्हा एकदा तिच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल झाल्याने चर्चेत आले आहे. मुंबई पोलिसांनी कंगनाचा बॉडीगार्ड कुमार हेगडेवर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हि आरोप लावणारी महिला मुंबईत मेकअप आर्टिस्टचं काम करत होती. डीएन नगर DN Nagar पोलिसांनी तक्रारकर्त्या महिलेची वैद्यकीय चाचणी प्राप्त झाल्यानंतर १९ मे रोजी रात्री गुन्हा नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे.

‘वर्क फ्रॉम होम’ मुळे होतोय पाठीचा आणि मानेचा त्रास ? एकदा 'या" टिप्स नक्की फॉलो करून पहा !

फिर्यादी महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार कुमार हेगडे आणि तिची २०१३ मध्ये ओळख झाली होती. हेडगेने तिला गेल्या वर्षी जूनमध्ये प्रपोज केलं. तिने त्याला होकार दिल्यानंतर हेगडे अधूनमधून तिच्या फ्लॅटवर जात होता. आणि बळजबरीने तिच्याशी संबंध ठेवत होता. अनेकवेळा त्याने तिच्यावर जबरदस्ती देखिल केली होती.  तसेच २७ एप्रिल ला आपल्या घरातून ५० हजार रुपये घेऊन पळाल्याचा आरोप महिलेनं केला आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live