चक्रीवादळाने मुंबई थांबली; पण 'बेस्ट' सुरुच राहिली

सूरज सावंत
गुरुवार, 20 मे 2021

एकीकडे या चक्रीवादळाने मुंबईला ब्रेक लागला असताना, 'बेस्ट'माञ सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय झाली नाही. त्यामुळेच बेस्ट बसचे कौतुक होत आहे.

मुंबई : मुंबईत Mumbai सोमवारी चक्रीवादळाने Tautkae Cyclone थैमान घातल्याने बेस्टचे BEST मोठे नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस, वाऱ्याने विविध ठिकाणी बसस्टॉप, विजेचे खांब कोसळले आहे. तर तुंबलेल्या पाण्यात १२२ बेस्ट बसेस बंद पडल्याची नोंद करण्यात आली आहे. Mumbai BEST Continued the service during Tautkae Cyclone

माञ एकीकडे या चक्रीवादळाने मुंबईला ब्रेक लागला असताना, 'बेस्ट'माञ सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय झाली नाही. त्यामुळेच बेस्ट बसचे कौतुक होत आहे.

हे देखिल पहा

समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या परिसरात म्हणजेच कुलाबा, गेट वे, मरीनलाइन्स, गिरगाव चौपाटी, दादर, माहिम या परिसरात झाडे पडून ५२ विजेचे खांब पडल्याने बेस्ट बसचे अंदाजे ४५ लाखांचे नुकसान झाले आहे. तर दोन बेस्ट बसचं नुकसान झालं असून  काही स्टाॅपवरील छत उडून गेल्याचे कळते. तर चक्रीवादळामुळे प्रवासी संख्येतही मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले, असे मनोज वराडे, उप जनसंपर्क अधिकारी बेस्ट बस यांनी सांगितले. Mumbai BEST Continued the service during Tautkae Cyclone

एकटे आमदार नव्हे संपूर्ण कुटुंब करतंय कोरोना रुग्णांची सेवा

सोमवारी बेस्टने तीन हजार ३३२ बसेस चालवल्या. पण अनेक मार्गावर कमी प्रवासी असल्याने दैनंदिन महसुलात घट नोंदवली गेली. त्यातून बेस्टला ५० लाख इतके नुकसान सहन करावे लागले. तर चक्रीवादळामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने त्यात बेस्ट बस अडकून १२२ बेस्ट बस या बंद पडल्याचे सांगण्यात येते. या बंद बेस्ट बसेस २४ तासात दुरूस्त करून पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी कार्यन्वित करण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live