कोव्हिडच्या लाटेने अडवली ‘डबल डेकर' बसची वाट

साम टिव्ही ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

बेस्टच्या शंभर डबल डेकर बसच्या खरेदीचा प्रस्ताव कोव्हिडच्या लाटेमुळे अडला आहे. मे महिन्यापर्यंत महापालिकेकडून बसखरेदीसाठी अनुदान मिळण्याबाबत निर्णय होऊन त्यानंतर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे

मुंबई  : बेस्टच्या शंभर डबल डेकर बसच्या खरेदीचा प्रस्ताव कोव्हिडच्या लाटेमुळे अडला आहे. मे महिन्यापर्यंत महापालिकेकडून बसखरेदीसाठी अनुदान मिळण्याबाबत निर्णय होऊन त्यानंतर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कोरोना संकट आटोक्यात आणण्यात किती खर्च होईल, याचा अंदाज नसल्याने बसखरेदीचा प्रस्ताव अडकला आहे. Mumbai BEST Double Decker Procurement Postponed due to Corona

मुंबईचा वारसा असलेल्या अवघ्या ४० डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात उरल्या आहेत. बेस्ट उपक्रमाने दोनशे डबल डेकर बस विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात शंभर बसची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ७० कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान मिळण्याचा प्रस्ताव बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. मात्र, सर्व पालिका यंत्रणा कोव्हिडची दुसरी लाट थोपवण्यात व्यग्र आहे. 

त्याच बरोबर कोरोना संसर्गादरम्यान होणाऱ्या खर्चाचा अंदाज नसल्याने बसखरेदीचा प्रस्ताव अडकला आहे. "मे महिन्यापर्यंत महापालिकेकडून शंभर बसच्या खरेदीसाठी आर्थिक मदत मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष खरेदी करण्यात येणार आहे. त्याबाबतच प्रस्तावही पाठविण्यात आला आहे, असे चेंबूरकर यांनी सांगितले. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी शंभर अशा दोनशे डबल डेकर बस विकत घेण्यात येणार आहे,'' असेही त्यांनी सांगितले. Mumbai BEST Double Decker Procurement Postponed due to Corona

उड्डाणपूल लक्षात घेऊन मार्ग निश्चिती
डबल डेकर बस म्हणजे बेस्टचा वारसा आहे. मुंबईकरांकडूनही अशा बेस्ट वाचवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा वारसा जपला जाईल. सध्या मुंबईत ठिकठिकाणी उड्डाणपूल झाले आहेत. त्यामुळे डबल डेकर बसच्या वाहतुकीला अडथळा होण्याची शक्‍यता आहे. सर्व गोष्टींचा आढावा घेऊनच बसचे मार्ग ठरवले जातील, असेही आशीष चेंबूरकर यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live