मुंबईत कोरोना लसीच्या वितरणाची जोरदार तयारी, वाचा चाचणीचे अपडेट्स

साम टीव्ही
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

मुंबईत कोरोना लसीच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु आहे. आरोग्य सेवकांना सर्वात प्रथम ही लस दिली जाणार आहे. सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिलीय. पाहुयात एक रिपोर्ट.

मुंबईत कोरोना लसीच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु आहे. आरोग्य सेवकांना सर्वात प्रथम ही लस दिली जाणार आहे. सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिलीय. पाहुयात एक रिपोर्ट.

कोरोनावरील लसीचं संशोधन अनेक देशांमध्ये केलं जातंय. अवघं जग कोरोना लसीकडे आशेनं डोळे लावून बसलंय. दुसरीकडे मुंबईत कोरोनाच्या लसीच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु आहे. कोरोना लस आल्यानंतर ती सर्वप्रथम आरोग्य सेवकांना दिली जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी साम टीव्हीला दिलीय.

दरम्यान ही लस सर्वप्रथम वैद्यकीय कर्मचारी, कोविड लढ्यात प्रत्यक्ष सहभागी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागनिहाय माहिती घेऊन आरोग्य शिबीर आयोजित केले जातील. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना लस देण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती मनपा सूत्रांनी दिलीय. तसेच ही लस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी दवाखाने, आरोग्य केंद्र यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

मुंबईतील नायर आणि KEM रुग्णालयांत ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू आहे. ही लस आतापर्यंत 163 स्वयंसेवकांना देण्यात आलीय. विशेष म्हणजे यातील कोणत्याही स्वयंसेवकांना याचे दुष्परिणाम जाणवलेले नाहीत. एकंदरीतच कोरोना लशीच्या वितरणासाठी मुंबई मनपा प्रशासन सज्ज झालंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live