नगरसेवकांना आता मोफत पार्किंग; वाहनतळांवर २० टक्के कोटा

साम टिव्ही ब्युरो
शनिवार, 15 मे 2021

नगरसेवकांना आता वाहनतळांवर मोफत पार्किंग करता येणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये नगरसेवकांना २० टक्के जागा राखीव ठेवण्यास प्रशासन अनुकूल आहे.

मुंबई  : नगरसेवकांना आता वाहनतळांवर मोफत पार्किंग करता येणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये नगरसेवकांना २० टक्के जागा राखीव ठेवण्यास प्रशासन अनुकूल आहे. सामान्य नागरिकांना मात्र चारचाकी वाहनाच्या पार्किंगसाठी तासाला २० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत. Mumbai Corporators to get free parking 

हे देखिल पहा - 

एमआयएमचे नगरसेवक शाहनवाज शेख यांनी याबाबत ठरावाची सूचना मांडली होती. या ठरावाच्या सूचनेवर महानगरपालिका प्रशासनाने स्थापत्य समितीत अहवाल सादर केला आहे. यात अशाप्रकारे २० टक्के जागा राखीव ठेवण्यास प्रशासन अनुकूल आहे. वाहनतळांच्या नियोजनासाठी महानगरपालिकेने वाहनतळ प्राधिकरण तयार केले आहे. या प्राधिकरणाला या मागणीबाबत पडताळणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे प्रशासनाने अहवालात मांडले आहे. 

धारावीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

सामान्य नागरिकाला पालिकेच्या वाहनतळावर चारचाकी उभी करण्यासाठी २० ते ६० रुपये मोजावे लागतात, तर नगरसेवकांना ही जागा मोफत मिळणार आहे. नगरसेवकांना सध्या महानगरपालिकेकडून बेस्टचा मोफत पास दिला जातो, तर काही वर्षांपूर्वी अँड्रॉईड मोबाईल आणि लॅपटॉपही देण्यात आला होता; मात्र पालिकेचा कारभार डिजिटल न झाल्याने हे लॅपटॉप बिनवापराचे झाले होते. Mumbai Corporators to get free parking 

कार्यालयापासून गेस्ट हाऊसपर्यंत...
नगरसेवकांनी अशा प्रकारच्या अनेक मागण्या यापूर्वी केल्या आहेत. प्रभागात काम करण्यासाठी नगरसेवकांना कार्यालय उपलब्ध करून देण्यापासून थंड हवेच्या ठिकाणी रेस्ट हाऊस बांधण्यापर्यंतच्या अनेक मागण्या नगरसेवकांनी केल्या होत्या; मात्र या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या नाहीत. त्याचबरोबर वांद्रे-वरळी सागरी सेतूवर टोलमाफी करण्याची मागणीही नगरसेवकांकडून करण्यात आली होती.
Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live