धारावीचं कोरोना संकट अधिक वाढलं, सार्वजनिक शौचालयांमुळे मोठा धोका

साम टीव्ही
मंगळवार, 28 एप्रिल 2020

एका सार्वजनिक शौचालायत साधारण 30 ते 50 शौचालय
- एका सार्व.शौचालयाचा 150 ते 200 जणांकडून वापर
- सार्वजनिक शौचालयांतून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका
- शौचालयांचं निर्जुंतुकीकरण करण्याचं मोठं आव्हान
- दोन आठवड्यातून एकदा केली जाते स्वच्छचा
- लोकसंख्या पाहता नियमित स्वच्छता राखणं अशक्य

आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीत कोरोनाचा संसर्ग वेगानं होतो आहे. जी आकडेवारी आपल्या हाती येतेय, ती धक्कादायक आहे. संपूर्ण मुंबई शहरात घोषित करण्यात आलेल्या कंटेनमेन्ट झोनपैकी ५० टक्के लोकं ही धारावीतील कंटेनमेन्ट झोनमध्ये अडकली आहे. या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रयत्न करणं हे मोठं आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे. धारावीतील दाटीवाटीची वस्ती आणि तिथे असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांमधून कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याची शंका उपस्थित केली जाते आहे. सोमवारी धारावीत कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळून आलेत. यात तपासणी असणाऱ्या 24 पैकी काही डॉक्टरांनाही लागण झाल्याची माहिती मिळतेय. आतापर्यंत एकटा धारावीत 288 रुग्ण आढळले असून 14 जणांचा मृत्यू झालाय. 

पहा सविस्तर व्हिडीओ-

नेमकं सार्वजनिक शौचालयांमुळे धोका कसा वाढू शकतो, 

  •  
  •  एका सार्वजनिक शौचालायत साधारण 30 ते 50 शौचालय
  •  
  • एका सार्व.शौचालयाचा 150 ते 200 जणांकडून वापर
  •  
  • सार्वजनिक शौचालयांतून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका
  •  
  • शौचालयांचं निर्जुंतुकीकरण करण्याचं मोठं आव्हान
  •  
  • दोन आठवड्यातून एकदा केली जाते स्वच्छचा

संबंधित बातम्या

Saam TV Live