मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांना होऊ शकते अटक?

सूरज सावंत
गुरुवार, 29 एप्रिल 2021

कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक घाडगे यांनी केलेल्या आरोपानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा पूर्वी अकोला येथील पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. परमबीरसिंग यांच्यावरचे आरोप गंभीर असून यात परमबिर यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही

मुंबई : वादग्रस्त अधिकारी परमबीरसिंग Parambirsingh यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर आणि त्यांच्या जवळच्या २७ अधिकाऱ्यावर कल्याणच्या बाजारपेठ पोलिस Police ठाण्यात पोलिस निरीक्षक घाडगे यांनी केलेल्या आरोपानुसार गुन्हा Offence नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा पूर्वी अकोला येथील पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. परमबीरसिंग यांच्यावरचे आरोप गंभीर असून यात परमबिर यांच्यावर अटकेची Arrest कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. Mumbai Ex Police Commissioner Parambirsingh May Be Arrested

दरम्यान पोलिस अधिकारी डांगे यांनीही अशाच प्रकारे तक्रार गृहमंञ्यांकडे केली आहे. त्यानुसार मुंबईत Mumbai परमबीरसिंग यांच्या विरोधात नवा गुन्हा होऊ शकतो. या तक्रारीत परमबीर यांनी पदाचा दूरुपयोग करून करोडोंची माया जमवली, अनेक कुख्यात गुंडांनाGoons मदत केली. मोठ्या प्रमाणात भ्रष्ठाचार Corruption केला. तसेच त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे नोंदवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार वादग्रस्त तसेच अंडरवर्ल्ड Underworld सोबत संबध असलेले मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी गंभीर तक्रार केली होती. त्यांच्या या तक्रारीच्या विरुध्द अकोला येथील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये परमविर सिंग यांच्या विरोधात तब्बल २७ विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात परमविर सिंग यांना कधीही अटक होवू शकते. भिमराव घाडगे यांच्या विरोधात एका खोटया फायरिंग प्रकरणी परमविंग सिंग यांनी अडकविले होते. Mumbai Ex Police Commissioner Parambirsingh May Be Arrested

काही बिल्डारांना त्यांनी केलेल्या गुन्हातुन वाचविण्यासाठी परमवीरसिंग यांनी घाडगे यांना सांगीतले होते. परंतु त्या बिल्डरांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांना वाचवु शकत नाही, असे घाडगे यांनी परमवीरसिंग यांना सांगितले होते. त्यामुळे भिमराव घाडगे हे आपले एैकत नसल्याने परमवीरसिंग यांनी त्यांच्या विरुध्द कट रचून एका खोटया फायरिंगच्या Firing गुन्हात अडकविले. नंतर या प्रकरणाचा तपास झाला आणि त्या फायरिंगच्या गुन्हातुन न्यायालयाने भिमराव घाडगे हे निरोध सिध्द झाले होते. 

घाडगेंचे ते अंडा सेलमधील एक वर्ष दोन महीने 
परमबिर सिंग यांच्या जवळया सहा वक्तीवर गंभीर स्वरुपाचे पुराव्यासहती गुन्हे दाखल केल्यामुळे घाडगे यांच्यावर तत्कालीन ठाणे पोलिस आयुक्त परमविर सिंग यांनी  खोटे गुन्हे दाखल केले  होते. तकेच नाही तर घाडगे यांना त्यांच्या पत्नीसह एखदया कुख्यात गुन्हेगारसारखे किंवा आतंकवादी Terrorist असल्यासारखे दाखवून त्यांना नवी मुंबई Navi Mumbai येथील तळोजा कारागृहात Taloja Jail अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. कोणताही गुन्हा नसतांना घाडगे आणि त्यांची पत्नीने एक वर्ष दोन महिने अंडासेलमध्ये घालविले. यावरुन पोलिस दलात परमविर सिंग यांची किती दशत होती हे सिध्द होते.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live