मुंबई बनलं कॅाक्रीटचं जंगल ..हिरवळ झाली 60 टक्क्याने कमी

साम टीव्ही
सोमवार, 22 मार्च 2021

मुंबई बनलं काँक्रीटचं जंगल
हिरवळ झाली ६० टक्क्यांनी कमी
मुंबईत उरली केवळ १३% हिरवळ

 

 

 

 

मुंबई शहर काँक्रीटचं जंगल बनलंय कारण मुंबईत केवळ १३% हिरवळ उरली असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय त्यामुळं मुंबई महापालिकेचा आपली मुंबई- हरित मुंबईचा नारा फक्त कागदावरच राहिल्याचं समोर आलंय

लेटरबॉम्बमुळं सरकार कोसळणार, सरकारवर का आहे टांगती तलवार ?

देशाची आर्थिक राजधानी मुंबई गेल्या काही वर्षात मुंबईचा विकास झपाट्यानं झाला.छोट्या-मोठ्या चालींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्यात.एकीकडे मुंबईचा असा विकास होत असताना दुसरीकडे निसर्गाचा ऱ्हास झालाय.या ३० वर्षांत मुंबईतील ४२ टक्के जंगल नष्ट झालं असून केवळ 13 टक्के  हिरवळ उरलीय वातावरण फाउंडेशन या संस्थेच्या अहवालातून हे धक्कादायक वास्तव समोर आलंय

वातावरण फाउंडेशनच्या निष्कर्षानुसार  गेल्या ३० वर्षांत मुंबईतील ४२ टक्के जंगल नष्ट झालंय.गेल्या ४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झालीय.. आता शहरात केवळ १३ टक्के हिरवळ  आहे...सर्वाधिक फटका गोरेगावला बसला आहे. २००१ मध्ये ६२.५ टक्के भागांत हिरवळ असलेल्या गोरेगावमध्ये २०११ मध्ये केवळ १७ टक्के हिरवळ उरली 

रस्ते दुरुस्ती,नवे प्रकल्प आणि इतर कामांमुळे झाडांवर संक्रात येतंय...यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून याकडे वेळीच लक्ष दिलं नाहीत तर मुंबईकरांवर मोठं संकट येऊ शकतं

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live