गृहमंत्र्यांनी १०० कोटी तुमच्या समोर मागितले का? उच्च न्यायालयाचा परमबीर सिंगांना थेट सवाल

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. आज सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने परमबीरसिंग यांच्यावर अवघड प्रश्नांची सरबत्ती केली

मुंबई : गृहमंत्र्यांनी तुमच्या अधिकाऱ्यांना दरमहा १०० कोटी आणून देण्याची मागणी तुमच्यासमोर केली होती का? असा थेट प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना विचारला आहे. तुम्ही केलेले आरोप हे केवळ ऐकीव गोष्टींवर केलेले आहेत, असेही मत न्यायालयाने नोंदवले. Mumbai High Court Asks Tough Questions to Ex Mumbai Police Commissioner Parambir Singh

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Of India) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) जाण्याचा सल्ला दिल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल केली होती. या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय आज सुनावणी सुरु आहे. 

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर हाय कोर्टात सुनावणी सुरू आहे. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर राज्य सरकारचा (State Government) युक्तिवाद झाला. परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारने परमबीर सिंग यांच्या जनहित याचिकेवर प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणी जनहित याचिका दाखल होऊच शकत नाही. परमबीर सिंह हे आता व्हिक्टीम कार्ड (Victim card) खेळू पाहत आहेत. ही याचिका दाखल करताना त्यांचा वैयक्तिक स्वार्थ स्पष्टपणे सिद्ध होत आहे, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयास सांगितले. 

तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला तोंडी माहिती दिली. एक पोलिस अधिकारी या नात्याने तुमचे वरिष्ठ काही गैर करत असतील तर तुम्ही त्यांच्या विरोधात पोलिस तक्रार का दाखल केली नाहीत, असा सवालही न्यायलयाने विचारला. तुमच्या ऑफिसर्सनी तुम्हाला तोंडी सांगितलं, मात्र तुमच्याकडे याचे काहीही पुरावे नाहीत, असेही न्यायालयाने याचिकाकर्ते परमबीर सिंग यांना सुनावले. Mumbai High Court Asks Tough Questions to Ex Mumbai Police Commissioner Parambir Singh

Edited By - Sanika Gade

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live