झाडांची कटाई करण्याच्या निर्णयाबाबत खुलासा द्या; न्यायालयाचे आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमधील तब्बल अडीच हजारहून अधिक झाडांची कटाई करण्याच्या निर्णयाबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिका आणि मेट्रो रेल्वे महामंडळला दिले आहेत.

मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमधील तब्बल अडीच हजारहून अधिक झाडांची कटाई करण्याच्या निर्णयाबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिका आणि मेट्रो रेल्वे महामंडळला दिले आहेत.

पर्यावरण प्रेमी झोरु बथेना यांनी  झाडे कटाईविरोधात न्यायालयात याचिका केली आहे. महापालिकेने मेट्रोच्या कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये जागा निश्‍चित केली आहे. कारशेडच्या बांधकामासाठी तेथील एकूण 2702 झाडांची कटाई करायची आहे. यापैकी 2646 जुर्नी, दुर्मिळ झाडे कापण्याची परवानगी मुंबई महापालिकेने चार दिवसांपूर्वी एका ठरावाद्वारे दिली आहे. ही परवानगी रद्द करण्याची मागणी याचिकादारांनी केली आहे. मात्र अद्यापही अंतिम निर्णय घेतला नसल्याची माहिती पालिकेच्या वतीने न्यायालयात देण्यात आली. निर्णय होण्यास किमान पंधरा दिवस लागतील, त्यामुळे तोपर्यंत झाडे कटाई होणार नाही, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, महापालिकेने झाडे कटाईबाबत जूनमध्ये जाहीर नोटीस दिली होती. त्यावेळेस याचिकादारासह शेकडो नागरिकांनी आणि पर्यावरण संस्थांनी झाडे कटाईबाबत लेखी हरकती दाखल केल्या होत्या. असे असतानाही याबाबत महापालिकेने नियमांचे उल्लंघन करुन निर्णय घेतला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये पाच तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी काही सदस्यांनीही या सरसकट कटाईला विरोध केला होता. त्यामुळे जेव्हा झाडे कापण्याचा निर्णय झाला तेव्हा हा विरोध न करण्याचे स्पष्टिकरण देणेही सदस्यांसाठी बंधनकारक आहे, मात्र त्याबाबत कोणताही खुलासा समितीकडून करण्यात आला नाही, असे याचिकादाराचे म्हणणे आहे.

Web Title: Mumbai High court order to Mumbai Municipal Corporation to tree cutting in Aarey colony


संबंधित बातम्या

Saam TV Live