विजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण करण्याच्या महत्वपूर्ण खटल्याचा निकाल आज येणार आहे. लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयात हा खटला सुरु आहे. खटल्याचा निकाल मल्ल्याच्या विरोधात गेल्यास त्याची मुंबई येथील आर्थर रोड कारागृहात रवानगी केली जाईल. विजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू झाली आहे. 

असे झाल्यास, युके येथील आलिशान घरात राहणाऱ्या विजय मल्याला तुरुंगातील कोठडीत राहावे लागणार आहे. आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये त्याला ठेवण्यात येणार आहे. या अगोदरच, आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन कोर्टमध्ये दिली आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवण्यात आलं होतं. 

दुसरीकडे, विजय मल्ल्याने आपल्याला भारताच्या ताब्यात दिले जाण्याच्या भीतीने बँकांचे पैसे चुकते करण्याची भाषा सुरु केली आहे. त्यामुळे आज येणाऱ्या  खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Mumbai Jail Keeps High-Security Cell Ready for Vijay Mallya

संबंधित बातम्या

Saam TV Live