...मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार! वाचा कसे असतील नियम?

साम टीव्ही
शनिवार, 30 जानेवारी 2021
  • मुंबईकरांना मोठा दिलासा! 
  • एक फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू
  • सर्वसामान्यांना तीन टप्प्यात करता येणार प्रवास

कोरोना महामारीमुळे बंद असलेली लोकलची दारं 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहेत. येत्या सोमवारपासून लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना देण्यात आलीय. पण, काही वेळा ठरवण्यात आल्यायत. सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास कधी करता येणार वाचा सविस्तर

...अनेक महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा आता सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता लोकलमधून प्रवेश करता येणाराय. अनेक महिन्यांपासून लोकल सेवेअभावी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. पण, सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं मोठा दिलासा दिलाय. 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, आरोग्याचे नियम पाळले जातील अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेयत. कोणत्या वेळेत प्रवास करता येणार आहे पाहुयात...

सर्वसामान्यांना प्रवास कधी?

  • सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत प्रवेश
  • दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत प्रवास करता येणार
  • रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार

सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत लोकलमधून प्रवास करता येणार नाहीये. या वेळेत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवास करू शकतील. पण, या वेळांमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहुयात.

या वेळांबाबत सामान्य प्रवाशी खूश नसल्याचं दिसतायत...संपूर्णवेळ प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली जातेय. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्णवेळ कधी सेवा सुरू होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live