Mumbai Local | मुंबई लोकल सुरु होण्याचे संकेत, वाचा कधी होणार सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु?

साम टीव्ही
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

कोरोनाचं संकट आल्यानंतर विमान, बस, एसटी, रेल्वेसारख्या वाहतुकीच्या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता अनलॉकमध्ये वाहतुकीच्या सुविधा सुरू करण्यात आल्यायत, मुंबई लोकलमध्ये मात्र सर्वसामान्यांना अद्याप प्रवेश दिला जात नाहीय.

कोरोनाचं संकट आल्यानंतर विमान, बस, एसटी, रेल्वेसारख्या वाहतुकीच्या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता अनलॉकमध्ये वाहतुकीच्या सुविधा सुरू करण्यात आल्यायत, मुंबई लोकलमध्ये मात्र सर्वसामान्यांना अद्याप प्रवेश दिला जात नाहीय. 7 महिन्यानंतर आता लोकल महिला, वकील आणि सुरक्षा रक्षक तसेच कामगारांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच प्रवाशांसाठी लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांना पडलाय. मात्र आता मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू होणार असल्याचे संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

लवकरच आम्ही मुंबईकरांना खूशखबर देणार आहोत. सर्व प्रवाशांना मुंबई लोकलमध्ये प्रवेश देण्याबाबत सकारात्मक अहवाल प्राप्त झाले आहेत. मुंबईची लोकल आता काही दिवसांत सर्वांसाठी धावणार आहे. 

याचाच अर्थ असा की, गेल्या 7 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लोकल आता सर्वांसाठी धावणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलमध्ये आता लवकरच सर्वांना प्रवेश मिळणार आहे. मात्र तरीही कोरोनाचं संकट अजून संपलेलं नाहीय. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी... मग आपण बसमध्ये असू, घरी असू किंवा लोकलमध्ये.


संबंधित बातम्या

Saam TV Live