मुंबई लोकलनं प्रवास करताय तर हे नियम वाचाच! नाहीतर इतका दंड बसू शकतो!

साम टीव्ही
रविवार, 31 जानेवारी 2021

कोरोना महामारीमुळे बंद असलेली लोकलची दारं, उद्यापासून सर्वांसाठी खुली होणार आहेत.  गर्दीच्या वेळा टाळून, इतरवेळी लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना देण्यात आलीय.

कोरोना महामारीमुळे बंद असलेली लोकलची दारं, उद्यापासून सर्वांसाठी खुली होणार आहेत.  गर्दीच्या वेळा टाळून, इतरवेळी लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना देण्यात आलीय.

मुंबई आणि उपनगर परिसरातील कार्यालये, आस्थापना यांनी. आपापल्या कार्यालयीन वेळांमध्ये आवश्यक तो बदल करावा अशी विनंती राज्य सरकारने केलीय. विशिष्ट वेळ निर्धारित करून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.

दरम्यान, उद्यापासून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करता येणारेय. मात्र यासाठी काही मर्यादीत वेळा असणार आहेत. या वेळेतच त्यांना प्रवास करावा लागेल. जर सर्वसामान्य प्रवाशांनी प्रवासी वेळ चुकवली तर मात्र त्यांना  200 रुपयांचा दंड भरावा लागेल. तसंच एक महिन्याच्या जेलची शिक्षाही होऊ शकते. कारण सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 ही वेळ वगळता उर्वरित वेळेत सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलीय. त्यामुळे मर्यादीत वेळ न पाळल्यास प्रवाशांना दंड भरावा लागणारेय.

मुंबई उपनगरीय रेल्वे सामान्य प्रवाशांसाठी सोमवारपासून सुरू होतेय. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ज्या प्रवाशांच्या पासची मुदत संपली, त्यांना येत्या सोमवारपासून शिल्लक राहिलेल्या दिवसांची मुदतवाढ देण्यात येणारेय. रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आलीय. तर कोरोनामुळे गेल्या वर्षी 24 मार्चपासून उपनगरीय रेल्वे सेवा बंद झाली होती. त्यानंतर लॉकडाऊनमुळे पासचे जेवढे दिवस शिल्लक राहिले, तेवढी मुदतवाढ प्रवाशांना देण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live