जोपर्यंत मेसेज येत नाही तोपर्यंत लसीकरणसाठी जाऊ नका..

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 1 मे 2021

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जनतेस आवाहन केले आहे. त्यांनी आज सांगितले की, लसीकरण केंद्राकडून पुष्टीकरण संदेश मिळाल्यानंतरच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांना रोगप्रतिबंधक लस टोचता येईल.

मुंबई: कोविड -१९ विरूद्ध लसीकरण Vaccination मोहिमेचा तिसरा टप्पा ओलांडत असताना, मुंबईच्या महापौर Mayor किशोरी पेडणेकर Kishori Pednekar यांनी जनतेस आवाहन केले आहे. त्यांनी आज सांगितले की, लसीकरण केंद्राकडून पुष्टी मिळाल्यानंतरच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांना रोगप्रतिबंधक लस Vaccine घेता येईल. Mumbai mayor says don't go for Vaccination until you receive message

''ज्या लोकांनी कोविन प्लॅटफॉर्मवर Cowin Portal नोंदणी केली आहे आणि संदेश प्राप्त केला आहे, तेच लसीकरण केंद्रांवर जाऊ शकतात. जोपर्यंत आपल्याला संदेश मिळत नाही तोपर्यंत केंद्रांवर जाऊ नका. जर आपण नोंदणी केली असेल परंतु संदेश मिळाला नसेल तर केंद्रात जाऊ नका, असे " पेडणेकर म्हणाल्या आहेत.

४५ ते ६० वर्षे वयोगटातील लोकांना त्यांच्या दुसर्‍या डोससाठी प्राधान्य दिले जाईल. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांना नोंदणी करून संदेश मिळाल्यानंतरच लसी ही दिली जाईल. जेव्हा आम्हाला लस प्राप्त होईल तेव्हा एखादे केंद्र लसीकरण केंद्र म्हणून कार्य करतील. असेही त्या म्हणाल्या आहेत. 

डबल मास्क Double mask घाला आणि विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहनही त्यांनी लोकांना केले आहे. कोरोनाव्हायरसच्या Corona संसर्गामध्ये चिंताजनक वाढ होत असताना, लसीचा तिसरा टप्पा शनिवारी सुरू झाला. तथापि, अनेक राज्यांनी लसींच्या कमतरतेअभावी १८ वर्षांवरील लोकांना लसीकरण करण्यास असमर्थता दाखविली आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live